मुंबईतील सर्व शाळांना नामफलक मराठीत देणे बंधनकारक !

मुंबईमधील सर्व शाळांचे फलक मराठी भाषेत असावेत, यासाठी मुंबई महानगरपालिकेने ५ एप्रिल या दिवशी परिपत्रक काढले आहे. मराठी भाषेचा अधिकाधिक वापर व्हावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला

संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांची विशेष अन्वेषण पथकाद्वारे चौकशी करणार ! – दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री

अंमलबजावणी संचालनालयाचे अधिकारी आणि व्यावसायिक जितेंद्र नवलानी यांच्यावर खंडणीचे आरोप केले होते. या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष अन्वेषण पथकाची (‘एस्.आय्.टी.’ची) स्थापना करण्यात आली आहे

परंडा (जिल्हा धाराशिव) येथे पशूवधगृहावर धाराशिव पोलिसांची धाड

जामगाव रस्त्याजवळील पशूवधगृहावर पोलिसांच्या विशेष पथकाने धाड टाकून कारवाई केली. या कारवाईत ३ जिवंत गाई, ५०० किलो मांस आणि चारचाकी वाहने, असा एकूण २३ लाख ४० सहस्र रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

पुत्तुरू (कर्नाटक) येथील श्री लक्ष्मीदेवी बेट्ट देवस्थानात युगादी निमित्त हिंदु राष्ट्रासाठी संकल्प !

श्री लक्ष्मीदेवी बेट्ट देवस्थानाचे पुजारी श्री. ऐतप्पा सफल्य यांनी देवीची विशेष पूजा करवून ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेत येणारे सर्व अडथळे दूर होऊन धर्मकार्य करणाऱ्या सर्वांचे रक्षण होऊ दे’, अशी विशेष प्रार्थना केली.

राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणातील रिक्त पद तातडीने भरण्याची याचिकेद्वारे मागणी

पोलीस तक्रार प्राधिकरणातील रिक्त पदे भरण्याची मागणी करावी लागणे संतापजनक आहे !

‘महाराष्ट्र राज्य गवंडी समाज सेवा संघा’च्या अध्यक्षपदी अविनाश आळंदीकर यांची नियुक्ती !

३ एप्रिल या दिवशी पंढरपूर येथे झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी अहमदनगर येथील ज्येष्ठ समाजबांधव मनोज राजापूरे होते.

जितेंद्र आव्हाड यांना मृत पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांविषयी नव्हे, तर मशीद आणि भोंगा यांविषयी पुळका ! – मनसे

जाधव यांनी म्हटले, ‘‘ठाण्यात वर्ष २००७-२००८ ला राबोडी आणि दुसरी भिवंडी या शहरांमध्ये दोन मोठ्या दंगली झाल्या होत्या. यात आपल्या दोन पोलिसांना प्राण गमावावे लागले होते. त्यांची क्रूर हत्या करण्यात आली. त्यांच्या कुटुंबियांना काय वाटत असेल ?

तळोजा (नवी मुंबई) येथे गोवंशियांची हत्या करणाऱ्या धर्मांधाला अटक !

गोवंश हत्या बंदीचा कायदा असूनही सर्रास होणाऱ्या गोवंशियांच्या हत्या थांबण्यासाठी कठोरात कठोर शिक्षा तत्परतेने होणे याला पर्याय नाही !

खासदार संजय राऊत यांची मालमत्ता अंमलबजावणी संचालनालयाकडून जप्त !

यामध्ये अंमलबजावणी संचालनालयाने राऊत यांची दादर येथील १ सदनिका, तसेच रामनाथ (अलिबाग) येथील ८ भूखंड कह्यात घेतले.

पिंपरी (जिल्हा पुणे) येथे कुरिअरने मागवल्या ९७ तलवारी, २ कुकरी, ९ म्यान !

संभाजीनगर पाठोपाठ पिंपरी येथे कुरिअरने एवढ्या मोठ्या प्रमाणात घातक शस्त्रे येणे गंभीर आहे ! यामागील सूत्रधार कोण आहे ? याचा शोध पोलिसांनी घेणे अपेक्षित आहे. अशा घटनांमुळे गुन्हेगारांवर पोलिसांचा धाक राहिलेला नाही, हे लक्षात येते.