
पुत्तुरू (कर्नाटक) – पुत्तुरच्या श्री लक्ष्मीदेवी बेट्ट देवस्थानात युगादीनिमित्त धर्मध्वज उभारून हिंदु राष्ट्रासाठी प्रार्थना करण्यात आली आणि प्रभु श्रीरामाचा नामजप सामूहिक करण्यात आला. श्री लक्ष्मीदेवी बेट्ट देवस्थानाचे पुजारी श्री. ऐतप्पा सफल्य यांनी देवीची विशेष पूजा करवून ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेत येणारे सर्व अडथळे दूर होऊन धर्मकार्य करणाऱ्या सर्वांचे रक्षण होऊ दे’, अशी विशेष प्रार्थना केली.
या वेळी श्री लक्ष्मीदेवी बेट्ट देवस्थानातील पुरोहित श्री. प्रवीणचंद्र भट, देवस्थानमधील सर्वश्री श्रीकृष्ण प्रसाद, लक्ष्मी प्रसाद, जनार्दन प्रसाद, उद्योगपती संतोष कुमार राय कैकार, उद्योगपती नवीन कुलाल, बालकृष्ण सोरके, धर्मप्रेमी सर्वश्री विजयकुमार, श्रीधर नोंड, सुधीर नोंड, जगदीश शेट्टी, सतीश भंडारी, राजेश बोळुवार, हिंदु जनजागृती समितीचे श्री. हरिप्रसाद शेट्टी, सनातन संस्थेचे श्री. दयानंद हेगडे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
थोडक्यात महत्त्वाचे : ०६.०६.२०२६
‘श्री महालक्ष्मीदेवी मंदिर परिसर विकास आराखड्या’तील १३६ जागांचे सर्वेक्षण पूर्ण ! – डॉ. विजय राठोड, जिल्हाधिकारी, कोल्हापूर
हिंजवडी ‘आयटी पार्क’ मधील ‘थिंकटेक इंडिया’ आस्थापन रातोरात बंद !
आरे परिसरातील ८० एकर जागेत ५ लाख वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ !
श्री महालक्ष्मीदेवी मंदिरासह परिसरातील गड-दुर्ग यांना एकत्र करून ‘टुरिस्ट सर्किट’ करणार ! – शंभूराज देसाई, खनिजकर्ममंत्री
महिला पर्यटकांचे व्हिडिओ काढणार्याला अटक