पुणे – महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यावरून पुणे महापालिकेच्या प्रवेशद्वारावर राष्ट्रवादी काँग्रेसने २८ फेब्रुवारी या दिवशी आंदोलन केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक प्रमुख नेत्यांनी या विरोधामध्ये रोष व्यक्त करत ‘राज्यपाल कोश्यारी यांनी २ दिवसांत क्षमा मागावी’, अशी मागणी केली आहे. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते राज्यपालांच्या विरोधात घोषणा देत असल्याने याठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.