देहली येथे हिंदु तरुणाची हत्या करणार्‍या रमझान अली याला अटक !

‘मॉब लिंन्चिंग’च्या (जमावाकडून केलेल्या हत्येच्या) नावाने हिंदूंवर आरोप करणारे धर्मनिरपेक्षतावादी, पुरोगामी आणि बुद्धीवादी हिंदु युवकाच्या हत्येचा निषेधही करणार नाहीत, हे लक्षात घ्या !

केरळमधील माकपच्या सरकारमधील हज मंत्री सरकारी पैशांतून अमेरिकेत घेणार उपचार !

स्वतःच्या वैद्यकीय उपचारांसाठी जनतेच्या करातून पैसे खर्च करणार्‍या मंत्र्यांना निवडून देणार्‍या केरळमधील जनतेला ही शिक्षाच होत !

कर्नाटक विधानसभेत धर्मांतरविरोधी विधेयक संमत !

कर्नाटकमध्ये भाजपचे सरकार आहे. केंद्रातही भाजपचे सरकार असतांना आता त्याने संपूर्ण देशात धर्मांतरविरोधी कायदा आणण्यासाठी पावले उचलावीत, अशी हिंदूंची अपेक्षा आहे !

श्री तुळजाभवानी मंदिराच्या परिसरात डान्सबार चालवणार्‍यांवर कठोर कारवाई करा !

विधान परिषदेत सर्वपक्षीय आमदारांची मागणी !
डान्सबारचा परवाना रहित करण्यात आल्याची गृहराज्यमंत्र्यांची माहिती !

(म्हणे) ‘सध्याचे सरकार देशाला सांप्रदायिक बनवत असून लोकांमध्ये फूट पाडत आहे !’ – जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला

काश्मीरमधील धर्मांध हे ‘धर्मनिरपेक्ष’ नसून ते धर्मांध वृत्तीचे असल्याने अजूनही हिंदू काश्मीरमध्ये राहू शकत नाहीत. याविषयी अब्दुल्ला का बोलत नाहीत ?

उत्तराखंडमध्ये काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री यांना शिवीगाळ केल्यावरून पक्षाच्या महामंत्र्यास रावत समर्थकांकडून मारहाण !

स्वतःच्या पक्षाच्या पदाधिकार्‍यास मारहाण करणारे कार्यकर्ते असणारा पक्ष कधीतरी कायद्याचे राज्य देईल का ?

हुमरमळा येथे मद्यासह २ कोटी रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या कह्यात

३१ डिसेंबरच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा पोलीस पथक मुंबई-गोवा महामार्गावर गस्त घालत होते. या वेळी हुमरमळा येथे महामार्गाच्या बाजूला एक कंटेनर उभा असल्याचे दिसले. त्या कंटेनरची तपासणी केली असता गोवा बनावटीच्या मद्याचे अडीच ते ३ खोके सापडले.

भाजपचे आमदार नितेश राणे यांना पोलिसांकडून नोटीस

याविषयी आमदार राणे यांनी सांगितले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेनेचे खासदार विनायक राऊत आणि पालकमंत्री उदय सामंत यांचे भाऊ किरण सामंत यांच्यातही वाद आहेत. त्याचे पडसाद कार्यकर्त्यांमध्ये उमटत आहेत.

‘‘प्रभु श्रीरामाने पित्यासाठी राजसिंहासन सोडले, तर आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांना सत्तेची एवढी हाव का ?’’

गोव्याचे आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी त्यांचे वडील तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा आमदार प्रतापसिंह राणे यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याचा निर्णय घोषित केला आहे.

सांकवाळ तीर्थक्षेत्रावरील पुरातन श्री विजयादुर्गा मंदिराच्या ठिकाणी वारसास्थळी ख्रिस्त्यांकडून पुन्हा फेस्ताच्या आयोजनासाठी अनधिकृतपणे मंडपाची उभारणी

जुने गोवे येथील वारसास्थळाच्या ठिकाणी अनधिकृत बांधकामाला विरोध करणारे आम आदमी पक्षाचे नेते या अनधिकृत मंडपाच्या विरोधात आंदोलन करतील का ?