Land Jihad On MAHIM GAD : राज्‍य संरक्षित स्‍मारक असलेल्‍या मुंबईतील माहीम गडाच्‍या बुरुजावर फडकावण्‍यात आला आहे हिरवा ध्‍वज !

गडावर फडकावण्‍यात आलेला हिरवा झेंडा !

मुंबई, १ ऑक्‍टोबर (वार्ता.) : पुरातत्‍व विभागाच्‍या अखत्‍यारीत असलेल्‍या आणि ‘राज्‍य संरक्षित स्‍मारक’ म्‍हणून घोषित असलेल्‍या मुंबईतील माहीम गडाच्‍या बुरुजावर चक्‍क हिरवा ध्‍वज फडकावण्‍यात आला आहे. मागील वर्षी दिवाळीमध्‍ये या गडावरील अतिक्रमण राज्‍यशासनाने हटवले होते. अतिक्रमण करणार्‍यांमध्‍ये ९० टक्‍क्‍यांहून अधिक जण मुसलमान होते. अतिक्रमण हटवल्‍यानंतर गडप्रेमींनी गडावर दीपोत्‍सव साजरा केला होता.

माहीम गडाच्‍या प्रवेशद्वारावर ‘ही वास्‍तू राज्‍य संरक्षित स्‍मारक आहे’ असा पुरातत्‍व विभागाचा फलक केवळ नावापुरता आहे. प्रवेशद्वारापासून ते आतपर्यंत मुसलमानांनी गडामध्‍ये मोठ्या प्रमाणात अवैध बांधकाम करून वस्‍ती केली होती. या विरोधात दुर्गप्रेमींनी सातत्‍याने केलेल्‍या तक्रारीनंतर राज्‍यशासनाने मागील वर्षी गडावरील २६७ कुटुंबांचे शासनाकडून पुनर्वसन करून गडामधील अवैध बांधकामे तोडून टाकली. त्‍यानंतर गडाच्‍या प्रवेशद्वाराला टाळे ठोकण्‍यात आले होते. त्‍यामुळे सद्यस्‍थितीत हा गड म्‍हणजे निर्जन आणि भयाण जागा झाला आहे. गडामध्‍ये मोठ्या प्रमाणात झाडेझुडपे वाढली आहेत. मद्यपी आणि अमली पदार्थ सेवन करणार्‍यांचा हा गड म्‍हणजे अड्डा झाला आहे. त्‍यामुळे ‘गडावर फडकावण्‍यात आलेले हिरवे निशाण आणि या गडामध्‍ये चालणारे अवैध धंदे यासंदर्भात पुरातत्‍व विभागाने गांभीर्याने कारवाई करणे आवश्‍यक आहे’, असे गडप्रेमींचे म्‍हणणे आहे.

संपादकीय भूमिका

  • लँड जिहादचाच हा प्रकार आहे. आज हिरवा ध्‍वज फडकावणार्‍यांनी उद्या तेथे अवैध बांधकामे करून गड स्‍वतःच्‍या नावावर केल्‍यास आश्‍चर्य वाटणार नाही !
  • हे सर्व होत असतांना पुरातत्‍व विभाग झोपा काढत असतो का ?