पुणे : येथील अवैध मशीद आणि मदरसा यांवर बुलडोझरद्वारे कारवाई करण्यात आली आहे. महानगरपालिकेने अवैध बांधकामांवर ही कारवाई केली आहे. पुण्यातील पिंपरी-चिंचवडमधील सर्व अवैध धार्मिक स्थळे पाडण्यात यावीत, असा आदेश उच्च न्यायालयाने दिल्यानंतर महापालिकेने ही कारवाई केली आहे. ६ महिन्यांपूर्वी अशा सर्व अवैध धार्मिक स्थळांना महानगरपालिकेने नोटीसही पाठवली होती; मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यानंतर आता महानगरपालिकेने कारवाई चालू केली आहे. मशीद आणि मदरसा यांच्यावर बुलडोझरच्या कारवाईला तेथील मुसलमानांचा तीव्र विरोध आहे. ही मशीद वाचवण्यासाठी मुसलमान समाजातील लोक मोठ्या संख्येने तेथे पोचले. दुसरीकडे, परिस्थिती चिघळू नये; म्हणून प्रशासनाने मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त केला होता.
आंदोलनाच्या वेळी पोलिसांनी मुसलमान समाजातील काही उत्तरदायी नेत्यांनाही कह्यात घेतले. त्यांना पहाटे ५ वाजता सोडण्यात आले. पाडण्यात आलेली मशीद पुण्याला लागून असलेल्या पिंपरी-चिंचवडमधील आहे. साधारण २५ वर्षांपूर्वी येथे मशीद बांधण्यात आली होती; मात्र गेल्या काही वर्षांपासून अमिया येथील दारूल उलूम जामिया नावाने येथे मदरसा चालवला जात आहे. याविरोधात हिंदु संघटनांनी तक्रारी केल्या होत्या. या कारवाईत मदरसा पूर्णपणे भुईसपाट करण्यात आला असून अवैध बांधकामामुळे मशिदीचा काही भागही पाडण्यात आला आहे.
असदुद्दीन ओवैसी यांचे आकांडतांडव !
या प्रकरणी एम्.आय.एम्. पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी सांगितले की, पुण्यात केवळ एक मशीद पाडली जात आहे. मशिदीच्या आजूबाजूची सहस्रो घरेही अवैध आहे. त्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही. असा भेदभाव का ? (म्हणजे अवैध मशिदही पाडू नये, असा ओवैसी यांच्या बोलण्याचा स्पष्ट अर्थ आहे. उलट ओवैसी यांनी अवैध मशीद बांधणार्या धर्मबांधवांना खडसवून पालिकेचे कौतुक केले पाहिजे होते ! – संपादक)
संपादकीय भूमिकाअवैध मशीद आणि मदरसा बांधेपर्यंत प्रशासन झोपले होते का ? |