सांकवाळ तीर्थक्षेत्रावरील पुरातन श्री विजयादुर्गा मंदिराच्या ठिकाणी वारसास्थळी ख्रिस्त्यांकडून पुन्हा फेस्ताच्या आयोजनासाठी अनधिकृतपणे मंडपाची उभारणी

जुने गोवे येथील वारसास्थळाच्या ठिकाणच्या अनधिकृत बांधकामाला विरोध करणारे आम आदमी पक्षाचे नेते या ठिकाणीही अनधिकृत मंडपाच्या विरोधात आंदोलन करतील का ? कि ख्रिस्त्यांच्या लांगूलचालनासाठी दुर्लक्ष करणार ?

सांकवाळ तीर्थक्षेत्रावरील पुरातन श्री विजयादुर्गा माता

सांकवाळ, २३ डिसेंबर (वार्ता.) – सांकवाळ येथील शंखवाळी तीर्थक्षेत्रातील पुरातन श्री विजयादुर्गा मंदिराच्या ठिकाण हे शासनाने वारसास्थळ म्हणून घोषित केले आहे आणि याला ‘द फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ (सांकवाळचे प्रवेशद्वार) असे नाव दिले आहे.

पुरातन श्री विजयादुर्गा मंदिराच्या ठिकाणी फेस्तासाठी ख्रिस्त्यांनी घातलेला अनधिकृत मंडप

या वारसास्थळाच्या ठिकाणी ख्रिस्त्यांकडून गेल्या काही वर्षांप्रमाणे यंदाही ७ ते १६ जानेवारी २०२२ या काळात फेस्ताचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने वारसास्थळाच्या ठिकाणी अनधिकृतपणे मंडप घालण्यात आला आहे.


हे पण वाचा : शंखवाळी तीर्थक्षेत्रावरील पुरातन श्री विजयादुर्गा मंदिराच्या ठिकाणी पूजा-अर्चा आणि नामस्मरणाचा कार्यक्रम यांना स्थानिक ख्रिस्त्यांचा विरोध !


सांकवाळ येथे पुर्वापार सेंट जोसेफ वाझ फेस्त शिंदोळी येथील चर्चच्या ठिकाणी होत होते; मात्र गेली काही वर्षे आयोजक स्थानिकांचा विरोध असूनही सांकवाळ येथील चर्चपासून ६ किलोमीटर अंतरावर ‘द फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ या वारसा स्थळाच्या ठिकाणी या फेस्ताचे आयोजन करतात. पोलीस पहारा आणि वाहतूक पोलीस यांच्या उपस्थितीत या फेस्ताचे आयोजन करण्यात येते.

पहा पाद्री आणि समर्थक कसे हिंदूंना अडवतात आणि प्राचीन तीर्थक्षेत्र नष्ट करतात.
(Source : Shankhavali Teerthkshetra GOA -facebook page)

स्थानिक जागरूक नागरिक सचित नाईक यांनी वर्ष २०२० मध्ये माहिती अधिकाराखाली अर्ज करून ‘द फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ या ठिकाणी ८ ते १६ जानेवारी २०२० या कालावधीत शासनाच्या अनुज्ञप्तीशिवाय फेस्ताचे आयोजन केल्याची माहिती उघडकीस आणली होती.