सांगलीत धर्मांधाकडून करणी काढून देण्याच्या नावाखाली २५ सहस्र रुपयांची फसवणूक : गुन्हा नोंद

अल्पसंख्यांक गुन्हेगारीमध्ये मात्र बहुसंख्यच आहेत. केवळ गुन्हा नोंद करून न थांबता त्यांच्यावर कठोर कारवाईच होणे आवश्यक आहे.

वीजचोरी केल्याप्रकरणी ३ कारखान्यांना ८४ लाख ८४ सहस्र रुपयांचे वीजदेयक आकारले !

वीजचोरी केलेल्यांना दंडासमवेत कठोर शिक्षा होणेही आवश्यक आहे !

रस्ते अपघात थांबणे आवश्यक !

जगभरातील एकूण वाहन संख्येच्या तुलनेत भारतात केवळ १ टक्के वाहने आहेत; परंतु रस्ते अपघातात ११ टक्के मृत्यू होतात; म्हणजेच भारतात प्रतिघंट्याला ५३ रस्ते अपघात होतात आणि प्रति ४ मिनिटाला एकाचा मृत्यू होतो.

पाकच्या हिंदुद्वेषाला विरोध केव्हा करणार ?

पाकमध्ये दूरचित्रवाहिनीवरील एका कार्यक्रमात एका पत्रकाराने सांगितले की, पाकमधील सरकारी आणि खासगी शाळांमध्ये हिंदुद्वेष शिकवला जात आहे. माझ्या मुलाने मला ‘आपण सिंधमध्ये रहातो, तर आपण हिंदूंना ठार का मारत नाही ?’

‘जीवन प्रमाणपत्र’ दिल्यावर मृत्यू पावल्यावर निवृत्तीवेतन देणार का ?

‘शासकीय अथवा अशासकीय कर्मचार्‍यांना निवृत्तीनंतर प्रत्येक मासाला ‘निवृत्तीवेतन’ (पेन्शन) देण्यात येते. त्यासाठी त्यांना ज्या अधिकोषातून आपण निवृत्तीवेतन घेतो, त्या अधिकोषात प्रतिवर्षी नोव्हेंबर मासात ‘जीवन प्रमाणपत्र’ द्यावे लागते. असे केल्यासच पुढील वर्षभर निवृत्तीवेतन चालू राहू शकते.’

किती लोकप्रतिनिधी जनतेला सन्मान देतात ?

लोकप्रतिनिधी शासकीय कार्यालयात आल्यास त्यांना योग्य तो सन्मान देणे आणि त्यांना अभिवादन करणे आदी अनेक उपचार राजशिष्टाचारामध्ये येत असून त्यांचे प्रशासकीय अधिकार्‍यांनी पालन करावे. तसे न करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करण्याची तंबीही आदेशात देण्यात आली आहे.

केरळचा लोकायुक्त कायदा आणि मंत्र्याच्या विरोधात झालेली कारवाई !

मंत्री जलील यांच्या याचिका न्यायालयात न टिकल्याने त्यांना मंत्रीपद सोडावे लागले आणि त्यांच्या चुलत भावालाही महाव्यवस्थापकाचे पद सोडावे लागले. एका नियमबाह्य गोष्टीमुळे दोन्ही व्यक्तींना पद सोडावे लागण्याची घटना क्वचितच घडली असावी.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती उत्कट भाव असलेल्या सनातनच्या संत पू. (श्रीमती) विजया दीक्षितआजी !

सनातनच्या ११३ व्या व्यष्टी संतपदी विराजमान झाल्याची आनंददायी घोषणा १७.११.२०२१ या दिवशी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी केली. या सोहळ्याच्या वेळी घडलेल्या वैशिष्ट्यपूर्ण घडामोडी आणि अन्य सूत्रे आज पाहूया.

सौ. ज्योतिका रवींद्र अंबीलवादे यांना कर्करोगाच्या आजारपणात झालेले त्रास आणि आलेल्या अनुभूती

मला शस्त्रकर्मासाठी असतांना ‘प.पू. गुरुदेव, तुम्हीच चाकांची आसंदी मागून धरली होतीत आणि तुम्ही म्हणालात, ‘चला, चला आपल्याला लवकर प्रारब्ध फेडून संपवायचे आहे.’ आत गेल्यावर मी ‘भूलतज्ञ हे परात्पर गुरु डॉक्टरच आहेत’, असा भाव ठेवला.

प्रेमभाव, साधनेची ओढ, सेवेची तळमळ असलेल्या आणि मुलाला पूर्णवेळ साधना करण्यास प्रोत्साहित करणार्‍या वर्धा येथील श्रीमती सुमती सरोदे (वय ६० वर्षे) !

‘हे गुरुदेवा, आम्हाला साधना करायला प्रोत्साहन देणारी आई लाभल्यामुळे मी पूर्णवेळ साधना करत आहे. आपल्या चरणांपर्यंत येण्याची संधी मिळाली, यासाठी आपल्या कोमल चरणी भावपूर्ण कृतज्ञता व्यक्त करतो.’