Stop Cricket With INDvsBAN : भाग्‍यनगर (तेलंगाणा) येथे १२ ऑक्‍टोबरला होणारा भारत-बांगलादेश यांच्‍यातील क्रिकेट सामन्‍याला अनुमती नाकारावी !

हिंदु जनजागृती समितीची जिल्‍हाधिकारी आणि पोलीस यांच्‍याकडे मागणी

जिल्‍हाधिकारी यांना निवेदने देतांना समितीचे कार्यकर्ते

भाग्‍यनगर (तेलंगाणा) – हिंदु जनजागृती समितीच्‍या कार्यकर्त्‍यांनी रंगारेड्डी येथील जिल्‍हाधिकारी कार्यालय आणि शमशाबाद येथील साहाय्‍यक पोलीस आयुक्‍त यांना निवेदन दिले. १२ ऑक्‍टोबर या दिवशी भारत आणि बांगलादेश क्रिकेट संघांमध्‍ये टी-२० क्रिकेट सामना आयोजित करण्‍यात आला आहे. त्‍याला अनुमती नाकारण्‍यात यावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्‍यात आली आहे.

साहाय्‍यक पोलीस आयुक्‍त यांना निवेदने देतांना समितीचे कार्यकर्ते

संपादकीय भूमिका

असे निवेदन देण्‍याची वेळी राष्‍ट्रप्रेमींवर का येते ? वास्‍तविक भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि केंद्र सरकार यांनी बांगलादेशाशी क्रिकेट सामने खेळण्‍याविषयी असा करार करणे अपेक्षित नव्‍हते !