कोल्हापूर – ७ ऑक्टोबर या दिवशी सहस्रो भाविकांच्या उपस्थितीत श्री टेंबलाईदेवीच्या टेकडीवर श्री त्र्यंबोलीदेवी यात्रा उत्साहात पार पडली. श्री महालक्ष्मीदेवी आणि श्री त्र्यंबोलीदेवी यांच्या भेटीचा अनुपम सोहळा सहस्रो भाविकांनी ‘याची देही याची डोळा’ पाहिला. रात्री श्री महालक्ष्मी मंदिर परिसरात देवीच्या पालखी प्रदक्षिणेसाठी भाविकांनी गर्दी केली होती. आतापर्यंत ६ लाखांहून अधिक भाविकांनी देवीचे दर्शन घेतले आहे.