सांगलीत धर्मांधाकडून करणी काढून देण्याच्या नावाखाली २५ सहस्र रुपयांची फसवणूक : गुन्हा नोंद

अल्पसंख्यांक गुन्हेगारीमध्ये मात्र बहुसंख्यच आहेत. केवळ गुन्हा नोंद करून न थांबता त्यांच्यावर कठोर कारवाईच होणे आवश्यक आहे.  – संपादक

प्रतिकात्मक छायाचित्र

सांगली – मुलीवर झालेली करणी मंत्राने काढून देतो असे सांगून २५ सहस्र रुपयांची फसवणूक करणारा समीर अहमद सय्यद (रा. खणभाग, सांगली) याच्यावर जादूटोणा प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी अनुसया सुरेश वाईंगडे यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. समीर यानेही सांगली शहर पोलीस ठाण्यात अर्जुन दिलीप पाटील, सुरेश वाईंगडे, आप्पा कराचे (रा. सांगलीवाडी) यांनी मारहाण करत ५० सहस्र रुपयांची खंडणी मागितल्याची तक्रार दिली असून त्यानुसार तिघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (हिंदु धर्मग्रंथात विविध त्रासांवर उपचार, उपाय दिलेले आहेत आणि देवताही त्रास दूर करतात; मात्र हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने ते हिंदु धर्मातील देवता, संत यांच्याकडे न जाता अन्य धर्मियांकडे अडचणी सोडवण्यासाठी जातात ! यातून हिंदूंना धर्मशिक्षणाची किती आवश्यकता आहे ?, तेच लक्षात येते ! – संपादक)

याविषयी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, २ वर्षांपूर्वी फिर्यादी वाईंगडे यांच्या मुलीच्या पोटात दुखत होते. त्या वेळी समीर अहमद सय्यद याने ‘मुलीवर कुणीतरी करणी केली आहे’, असे सांगून ती काढून देण्यासाठी २५ सहस्र रुपये घेतले. त्या वेळी समीर अहमद सय्यद याने ‘काहीतरी मंत्र म्हणून’ करणी काढली, असे सांगितले; मात्र यातून लाभ न झाल्याने अनुसया यांनी तक्रार दिली.