आश्वासन देऊनही अभियांत्रिकीची बनावट पदविका घेतलेल्या कर्मचार्‍यांची चौकशी चालू केली नाही ! – आम आदमी पक्षाचा आरोप

मान्यता नसलेल्या संस्थांमधून अभियांत्रिकीची बनावट पदविका मिळवून काही कर्मचार्‍यांनी महापालिकेत पदोन्नती मिळवली असल्याचे उघड झाले आहे. या पार्श्वभूमीवर महापौरांनी आश्वासन देऊनही प्रशासनाने चौकशी चालू केली नाही.

हलाल अर्थव्यवस्थेच्या विरोधात कृतीशील होण्याचा पुणे येथील राष्ट्र आणि धर्म प्रेमी महिलांचा निर्धार !

येथील जिज्ञासू श्री. राजेंद्रजी लुंकड यांच्या धर्मपत्नी सौ. कमल लुंकड यांच्या संपर्कातील महिलांसाठी ‘हलाल प्रमाणपत्र’ या विषयासंदर्भात जागृती करण्यासाठी एका चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.

ऊस देयकातून शेती पंपाची वीजदेयके वसूल करा ! – रामराजे नाईक-निंबाळकर, सभापती, विधानपरिषद

रामराजे नाईक-निंबाळकर म्हणाले, ‘‘तालुक्यातील वीजपंपाची जोडणी तोडण्याचे काम मोठ्या प्रमाणात चालू आहे. विद्युत् जनित्राचाच वीजपुरवठा खंडित केल्यामुळे नियमित वीजदेयके भरणार्‍यांवर अन्याय होत आहे.

सोलापूरच्या पोलीस अधीक्षकांच्या नावे ‘फेसबूक’वर बनावट खाते सिद्ध करून पैशांची मागणी केल्याच्या प्रकरणी राजस्थानमधील एकाला अटक !

देवकरण हनुमानसिंग रावत आणि मोनुकुमार नथुसिंग पाल, अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

वाई (जिल्हा सातारा) येथील उपकोषागारातील अधिकार्‍यास लाच घेतांना पकडले !

तळागाळातील भ्रष्टाचार थांबवण्यासाठी लाच घेणार्‍यांना कठोर शिक्षाच आवश्यक आहे.

भारतात असे कधी होणार ?

फ्रान्सच्या गृहमंत्र्यांनी देशातील एका मशिदीला ६ मासांसाठी बंद करण्याची घोषणा केली आहे. या मशिदीच्या इमामाकडून दिली जाणारी कट्टरतावादी धार्मिक भाषणे रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले.

‘नीच व्यक्ती कधी स्वतःच्या प्रवृत्तीचा त्याग करत नाही’, ही आचार्य चाणक्य यांची शिकवण लक्षात ठेवून भारताने त्याच्या शत्रूंना नीट ओळखून युद्धनीती आखावी !

‘जर आपण आपल्या शत्रूंना नीट ओळखले नाही, तर आपले सहिष्णु आणि अहिंसक इत्यादी सद्गुण आपल्याला आत्मघाताकडे ढकलत रहाणार नाहीत का ?

संततीच्या र्‍हासाला कारणीभूत असणारी व्यसनाधीनता !

ढोबळमानाने असे म्हणता येईल की, शके १७९५ पासून १८१९ पर्यंतच्या काळात (वर्ष १८७३ ते १८९७) जन्मलेल्या व्यक्तींच्या बहुतेक कुंडलींमध्ये काही व्यसनाधीनता आढळून आल्या. या व्यसनांचे परिणाम प्रत्यक्ष त्यांच्यावर न होता त्यांच्या संततीवर झाले.

लोकशाही स्थिर करण्यासाठी पैशांचा अपवापर थांबवा !

‘आज ‘निवडणुका, मतदान आणि पैसा’, असे समीकरण झाले आहे. पैसे न वाटता मतदान होईल, तेव्हाच ‘खरे मतदान झाले’, असे म्हणता येईल.

अवैध शस्त्र व्यापार आणि आतंकवाद्यांचे शस्त्र खरेदीचे आंतरराष्ट्रीय केंद्र : पाकिस्तानातील ‘दारा आदम खेल’ !

‘कोणत्याही देशात सामान्यतः व्यापाराचे केंद्र असलेले शहर, म्हणजे विद्युतदिव्यांची रोषणाई असलेली दुकाने, मालवाहू ट्रकची ये-जा, अधिकोषांच्या (बँकांच्या) शाखांची रेलचेल असे दृश्य डोळ्यांसमोर येते