तळागाळातील भ्रष्टाचार थांबवण्यासाठी लाच घेणार्यांना कठोर शिक्षाच आवश्यक आहे. – संपादक
सातारा, २२ डिसेंबर (वार्ता.) – येथील उपकोषागारातील अधिकारी सुधाकर शंकर कुमावत यांना १ सहस्र रुपयांची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले.
तक्रारदाराचे ३ मासांचे वेतन आणि २० वर्षांच्या ७ व्या वेतन आयोगाच्या फरकाचे २ लाख ७७ सहस्र रुपयांचे देयक प्रलंबित होते. यासाठी ते वाई येथील उपकोषागार कार्यालयात हेलपाटे मारत होते. त्या वेळी अधिकारी सुधाकर कुमावत यांनी या कामासाठी तक्रारदारांकडे १० सहस्र रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीअंती २ सहस्र रुपये देण्याचे ठरले. तक्रारदारांनी याविषयी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. त्यानुसार तपासणी करून सापळा रचण्यात आला. तक्रारदाराकडून १ सहस्र रुपये लाच स्वीकारतांना कुमावत यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले.