अशा भ्रष्ट अधिकार्यांचे तात्काळ निलंबन करायला हवे.
पिंपरी – पोलीस उपनिरीक्षक हेमा सोळुंके आणि साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अशोक देसाई यांनी तक्रारदाराकडे बलात्काराचा गुन्हा नोंद न करण्यासाठी १ लाख रुपयांची मागणी केली होती. तडजोडीअंती तक्रारदाराकडून ७० सहस्र रुपये स्वीकारण्यास सोळुंके यांनी सहमती दर्शविली. सदर घटनेविषयी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला माहिती दिली असता त्यांनी घटनेची निश्चिती करून महिला पोलीस उपनिरीक्षकाला कह्यात घेतले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून लाच स्वीकारणारे साहाय्यक उपनिरीक्षक देसाई यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी पथकाला धक्का देऊन रक्कम घेऊन दुचाकीवरून पळ काढला. सोळुंके आणि देसाई दोघेही सांगवी पोलीस ठाण्यात कार्यरत होते.