नागपूर येथील समाजसेवक सुनील जवादे यांची ४ अल्पवयीन मुलांकडून हत्या !

समाजातील तरुणांनी स्वतःचे वर्तन चांगले ठेवावे, यासाठी मार्गदर्शन करणारे समाजसेवक आणि ‘समता सैनिक दला’चे निमंत्रक सुनील जवादे यांची ४ अल्पवयीन मुलांनी निर्घृण हत्या केली आहे.

अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकडे शिष्यवृत्तीचे पैसे मागणार्‍या महाविद्यालयांवर कारवाई होणार !

शुल्क भरण्यासाठी आग्रह धरून कागदपत्रांचीसुद्धा अडवणूक करण्यात येत आहे, अशा तक्रारी अनेक विद्यार्थी आणि पालक यांनी सरकारकडे, तसेच राज्यातील समाजकल्याण विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयांकडे केल्या आहेत.

सातारा-स्वारगेट खासगी शिवशाही बससेवा चालू !

प्रवाशांच्या सोयीसाठी आपण खासगी शिवशाही बस चालू केल्या आहेत, अशी माहिती सातारा आगार व्यवस्थापक रेश्मा गाडेकर यांनी दिली आहे.

२६/११ चे मुंबईवरील आक्रमण हे आतंकवाद्यांची भ्याड मनोवृत्ती स्पष्ट करणारे होते ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

‘पोलीस आणि एनएसजी कमांडो यांनी गोळ्या झेलून अनेक आतंकवाद्यांना कंठस्नान घातले. शौर्य, धैर्य आणि समर्पण यांच्यासमोर नतमस्तक होण्याचा अन् कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे’, असे मुख्यमंत्री म्हणाले.

विकासशुल्कातील वाढीच्या विरोधात भाजपचे नागपूर सुधार प्रन्यास कार्यालयासमोर आंदोलन !

सरकार झोपेचे सोंग घेऊन गरिबांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप

वाहन अडवून मारहाण करून मोठ्या चोरीच्या आरोपाखाली ३ गोरक्षकांवर गुन्हा नोंद; एकाला अटक !

नंदुरबार पोलिसांची दुटप्पी कारवाई ! गोमांसाची वाहतूक करणार्‍यांना अभय आणि गोरक्षकांवर कारवाई, हा कुठला न्याय ?

शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांच्या जालना येथील कार्यालयावर ‘ईडी’ची धाड !

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी येथील ‘शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांनी रामनगर साखर कारखाना खरेदी, तसेच कारखान्यांच्या भूमीत भ्रष्टाचार केला आहे’, असा आरोप काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत केला होता.

केवळ ट्वीट करून किंवा माध्यमांमध्ये प्रतिक्रिया देऊन काय साध्य करत आहात ?

समीर वानखेडे यांच्यावरील आरोपांविषयी मुंबई उच्च न्यायालयाचा नवाब मलिक यांना प्रश्न

हिवाळी अधिवेशन मुंबई येथे घेण्याचा मंत्रीमंडळाचा निर्णय !

२९ नोव्हेंबर या दिवशी विधीमंडळ कामकाज समितीची बैठक होणार असून या बैठकीत अधिवेशन कोणत्या दिवशी घ्यायचे ? हे निश्चित करण्यात येईल.