केवळ ट्वीट करून किंवा माध्यमांमध्ये प्रतिक्रिया देऊन काय साध्य करत आहात ?

समीर वानखेडे यांच्यावरील आरोपांविषयी मुंबई उच्च न्यायालयाचा नवाब मलिक यांना प्रश्न

सौजन्य : बार अँड बेंच

मुंबई – अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांनी केवळ आरोपांवर न थांबता रितसर तक्रार का केली नाही ? केवळ ‘ट्वीट’ करून किंवा माध्यमांमध्ये प्रतिक्रिया देत काय साध्य करत आहात ? असे प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाने अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांना केले. २५ नोव्हेंबर या दिवशी नवाब मलिक यांच्या अधिवक्त्यांना न्यायालयाच्या या निर्णयाला सामोरे जावे लागले. यावर पुढील सुनावणी होईपर्यंत म्हणजे ९ डिसेंबरपर्यंत समीर वानखेडे यांच्यावर आरोप करून नयेत, असे निर्देश न्यायालयाने नवाब मलिक यांना दिले आहेत.

मागील काही दिवसांपासून नवाब मलिक यांनी अमली पदार्थविरोधी पथकाचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर ‘ट्वीट’द्वारे आणि प्रसिद्धीमाध्यमे यांवर विविध आरोप केले. याविषयी समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात मानहानीचा खटला प्रविष्ट केला आहे. यावरील सुनावणीच्या वेळी न्यायालयाने वरील निर्देश दिले.