
नागपूर – समाजातील तरुणांनी स्वतःचे वर्तन चांगले ठेवावे, यासाठी मार्गदर्शन करणारे समाजसेवक आणि ‘समता सैनिक दला’चे निमंत्रक सुनील जवादे यांची ४ अल्पवयीन मुलांनी निर्घृण हत्या केली आहे. २५ नोव्हेंबर या दिवशी पहाटे ४-५ वाजल्याच्या सुमारास आरोपींनी त्यांच्या डोळ्यात लाल मिरचीची पूड टाकून त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी वार केले. त्यामुळे जवादे यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शहरातील इमामवाडा पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात घडली. पोलिसांनी या प्रकरणी ४ आरोपींना अटक केली आहे. समाजसेवक सुनील जवादे यांचा संबधित मुलांसमवेत वाद झाला होता त्यातून ही हत्या झाली.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे मुख्यमंत्र्यांनी घेतले दर्शन !
आजच्या थोडक्यात महत्त्वाच्या बातम्या (२४.७.२०२६)
हिंगणगाव-खामगाव टेक (पुणे) येथील २४ कोटी रुपयांचा पूल पहिल्याच पावसात कोसळला !
ठाणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस !
नाशिककरांना ५० अत्याधुनिक वातानुकूलित ई-बसगाड्या मिळणार !
‘अन्न व औषध प्रशासना’कडून पश्चिम महाराष्ट्रातील १२ आस्थापनांचे परवाने निलंबित !