मुंबई – वर्ष २०२१ चे हिवाळी अधिवेशन मुंबई येथे घेण्याचा निर्णय २५ नोव्हेंबर या दिवशी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. यापूर्वी ७ डिसेंबर हा अधिवेशनाचा दिवस निश्चित करण्यात आला होता; मात्र अधिवेशनाचे स्थळ निश्चित न झाल्याने अधिवेशन चालू होण्याचा दिवस पुढे जाण्याची शक्यता आहे. २९ नोव्हेंबर या दिवशी विधीमंडळ कामकाज समितीची बैठक होणार असून या बैठकीत अधिवेशन कोणत्या दिवशी घ्यायचे ? हे निश्चित करण्यात येईल.