जालना – भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी येथील ‘शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांनी रामनगर साखर कारखाना खरेदी, तसेच कारखान्यांच्या भूमीत भ्रष्टाचार केला आहे’, असा आरोप काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत केला होता. यानंतर २६ नोव्हेंबर या दिवशी येथे अंमलबजावणी संचालनालयाच्या (‘ईडी’च्या) पथकाने खोतकर यांच्या कार्यालयावर धाड टाकली. या वेळी विविध कागदपत्रे आणि दस्तऐवज यांची पथकाने पडताळणी केली.
या पथकाने रामनगर साखर कारखाना खरेदी प्रकरणी जालना बाजार समितीच्या मुख्य कार्यालयात जाऊन चौकशी केली आहे. त्यानंतर जुन्या मोंढ्यातील अर्जुन खोतकर कॉम्प्लेक्सच्या कार्यालयातही ‘ईडी’च्या पथकाने चौकशी केली आहे, अशी माहिती समोर आली आहे. येथे चौकशी केल्यानंतर हे पथक पुन्हा बाजार समिती कार्यालयात आले. येथेही या पथकाने बाजार समितीमधील काही कागदपत्रांची पडताळणी केली.