विकासशुल्कातील वाढीच्या विरोधात भाजपचे नागपूर सुधार प्रन्यास कार्यालयासमोर आंदोलन !

सरकार झोपेचे सोंग घेऊन गरिबांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप

नागपूर, २६ नोव्हेंबर (वार्ता.) – येथील नागपूर सुधार प्रन्यासकडून विकासशुल्कात ३ पट केलेल्या वाढीच्या विरोधात भाजपच्या वतीने २५ नोव्हेंबर या दिवशी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. भाजपचे शहराध्यक्ष तथा आमदार प्रवीण दटके यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. ‘सरकार झोपेचे सोंग घेऊन काम करत असून ते गरिबांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहे’, असा आरोप आमदार प्रवीण दटके यांनी या वेळी केला. भाजप युवा मोर्चाच्या वतीने महाविकास आघाडी सरकारचा प्रतीकात्मक पुतळा जाळून निषेध करण्यात आला. ‘वाढीव विकासशुल्काचा काळा अध्यादेश रहित करावा’, अशीही मागणी करण्यात आली.