भारतात समान नागरी कायदा अस्तित्वात येईल !

श्री क्षेत्र आप्पाचीवाडी कुर्ली (जिल्हा बेळगाव) येथील श्री हालसिद्धनाथ देवाची भाकणूक !

श्री हालसिद्धनाथ

निपाणी- श्री क्षेत्र आप्पाचीवाडी कुर्ली (तालुका निपाणी, जिल्हा बेळगाव, कर्नाटक) येथील श्री हालसिद्धनाथ देवाच्या यात्रेचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे भाकणूक होय ! २४ ऑक्टोबरला पहाटे ही भाकणूक झाली. यावर्षीच्या भाकणुकीतील काही नवीन भाकिते पुढीलप्रमाणे आहेत.

१. भारत देशात समान नागरी कायद्याचा हक्क (अस्तित्वात) येईल. गोरगरीब जनता सुखी राहील. आनंदात राहील.

२. जगातील तापमान वाढीचा धोका वाढेल. जंगलात आग लागेल. वन्य जीवन आणि औषधी वनस्पती पृथ्वीवरून नष्ट होतील.

३. पावसाअभावी पेरणी पाण्याचा ऋतुमान बदलत जाईल. (पूर्वी जूनच्या तिसर्‍या किंवा चौथ्या आठवड्यात पेरण्या होत होत्या. हळूहळू पाऊस पुढे सरकला. त्यामुळे जूनमध्ये होणार्‍या पेरण्या जुलैच्या दुसर्‍या किंवा तिसर्‍या आठवड्यात अथवा ऑगस्टमध्येही कराव्या लागतील.)

(सेवेकरी : श्री. वीरभद्र विभुते आणि श्री. अजिंक्य विभुते, कुर्ली)

(सविस्तर भाकणूक लवकरच प्रसिद्ध करत आहोत ! )