परमबीर सिंह आणि रश्मी शुक्ला यांना कोरेगाव भीमा चौकशी आयोगाकडून समन्स !

रश्मी शुक्ला आणि परमबीर सिंह

पुणे – कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी नेमलेल्या चौकशी आयोगाने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि ज्येष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांना आयोगासमोर साक्ष देण्यासाठी उपस्थित रहाण्याविषयी समन्स (सूचना) दिले आहे. ३१ डिसेंबर २०१७ या दिवशी शनिवारवाडा येथे झालेली एल्गार परिषद आणि १ जानेवारी २०१८ या दिवशी कोरेगाव भीमा येथे झालेला हिंसाचार या दोन्ही वेळी रश्मी शुक्ला पुणे पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत होत्या, तर परमबीर सिंह यांनी अतिरिक्त पोलीस महासंचालक म्हणून एल्गार परिषदेशी निगडित आरोपींकडील शासनाधीन केलेले पुरावे पत्रकार परिषदेत सादर केले होते. या दोघांची साक्ष महत्त्वाची असल्याने ही ८ नोव्हेंबर या दिवशी आयोगासमोर उपस्थित रहाण्यासाठी रश्मी शुक्ला आणि परमबीर सिंह यांना समन्स बजावले आहे.