हिंदु जनजागृती समितीच्या वतीने भांडुप (मुंबई), खालापूर (रायगड) आणि उमरगाव (गुजरात) येथे विजयादशमीनिमित्त शस्त्रपूजन कार्यक्रम साजरा !
विजयादशमीच्या दिवशी शस्त्रपूजन करण्याची विशेष परंपरा आहे. या दिवशी नित्य जीवनात उपयोगात असणार्या वस्तूंचे शस्त्रांच्या रूपात पूजन केले जाते. १५ ऑक्टोबर या दिवशी भांडुप (मुंबई), खालापूर (जिल्हा रायगड) आणि उमरगाव (गुजरात) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शस्त्रपूजन करण्यात आले.