गुरु मा कांचन गिरीजी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेविषयी चर्चा करण्यासाठी घेणार राज ठाकरे यांची भेट !

मुंबई – हिंदुत्व मागे जात आहे. त्यामुळे संपूर्ण देशात हिंदु राष्ट्राचा आवाज घुमावा, यासाठी मी प्रयत्न करणार आहे. त्यासाठीच मी मुंबईत आले आहे. संपूर्ण महाराष्ट्रात हिंदु राष्ट्राचा ध्वज फडकवणार आहे, असे वक्तव्य ‘महाकाल मानव सेवा’ या संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा गुरु मा कांचन गिरीजी यांनी १७ ऑक्टोबर या दिवशी प्रसिद्धीमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत केले. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेविषयी चर्चा करण्यासाठी १८ ऑक्टोबर या दिवशी ते मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत.
या वेळी गुरु मा कांचन गिरीजी म्हणाल्या, ‘‘महाराष्ट्रातील प्रत्येक घरात भगवा ध्वज फडकण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. राज ठाकरे यांच्यामध्ये मी बाळासोहब ठाकरे यांचे रूप पहात आहे. राज ठाकरे हे बाळासाहेबांच्या मार्गाने चालतील. बाळासाहेब ठाकरे जे बोलत होते, त्याप्रमाणे करत होते. ते हिंदुत्वनिष्ठ होते. भारताच्या सुरक्षेसाठी हिंदुत्वनिष्ठांची आवश्यकता आहे. भारताला हिंदु राष्ट्र घोषित करावे, यासाठी मी काश्मीरमधील लाल चौकात जाऊन हिंदु राष्ट्राचा ध्वज लावणार आहे.
जलदगती न्यायालये स्थापन करण्याच्या पंतप्रधानांच्या निर्णयाचे स्वागत ! – डॉ. सावंत, मुख्यमंत्री
‘एकादश तीर्थयात्रा’ योजनेचा आजपासून खांडोळा येथून शुभारंभ होणार
‘मराठी अभ्यास केंद्रा’ची मराठी शाळांतील इंग्रजी बालवाड्यांविरुद्ध बैठक !
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून गोमांसाची तस्करी करणारे वाहन पकडले; दीड टन मांस जप्त
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे मुख्यमंत्र्यांनी घेतले दर्शन !
आजच्या थोडक्यात महत्त्वाच्या बातम्या (२४.७.२०२६)