चिपी येथील ‘सिंधुदुर्ग विमानतळा’चे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील चिपी येथील ‘सिंधुदुर्ग विमानतळा’चे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक मंत्री आणि लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत ९ ऑक्टोबरला मोठ्या थाटात उद्घाटन झाले.

श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात कायदेशीर नियमावलीचे उल्लंघन केल्याच्या प्रकरणी गुन्हा नोंद करावा !

मागणीचे निवेदन ‘श्री अंबाबाई भक्त समिती’ आणि ‘पतित पावन संघटना’ यांच्या वतीने जुना राजवाडा येथील पोलीस ठाण्यात देण्यात आले आहे.

सनातनच्या ग्रंथांचा लाभ घेऊन नागरिक चांगले भवितव्य घडवू शकतात ! – ग्लेन टिकलो, आमदार, भाजप, गोवा

गोव्यात सनातन संस्थेच्या ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’स उत्तम प्रतिसाद

कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवीच्या मंदिरात बाँब ठेवल्याचा दूरभाष केल्याच्या प्रकरणी दोघे जण कह्यात

या प्रकरणाचे अधिक अन्वेषण करत पोलिसांनी पेठ वडगाव येथील बाळासाहेब कुरणे आणि सुरेश लोंढे या दोघांना कह्यात घेतले आहे.

(म्हणे) ‘क्रूझ’वरील धाड बनावट, केंद्रशासनाने समिती स्थापन करून याची चौकशी करावी !’ – नवाब मलिक

अमली पदार्थ सेवन करणार्‍यांची बाजू घेणारे नवाब मलिक आणि चित्रपटसृष्टीतील कलाकार यांचा नेमका काय संबंध आहे ? याची चौकशी करण्याची आवश्यकता आहे, असेच जनतेला वाटते !

गिर्ये आणि आचरा येथे सापडलेल्या चिनी बनावटीची संपर्क यंत्रणा असलेल्या नौकांची अनुज्ञप्ती ३ मासांसाठी रहित

या दोन्ही नौकांची अनुज्ञप्ती ३ मासांसाठी रहित करण्यासह दोन्ही मासेमारी नौकांना मिळून ३३ सहस्र ६०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे, तसेच या नौकांवर पुढील कायदेशीर कारवाईही करण्यात येणार आहे.

नवरात्रोत्सवात प्रतिघंट्याला १ सहस्र भाविकांना दर्शन मिळावे असे नियोजन ! – शिवराज नाईकवाडे, सचिव, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती

भाविकांची वाढती संख्या पहाता ८ ऑक्टोबर या दिवशी प्रायोगिक तत्त्वावर ९०० भाविकांना दर्शनासाठी सोडण्यात आले.

लाखाचे बारा हजार !

एकूणच चित्र पाहिले, तर सरकारी आस्थापनांमध्ये कामाप्रती उदासीनता आणि सावळा गोंधळच दिसून येतो. नफ्यात असलेली आस्थापने कह्यात घेऊन ती दिवाळखोरीपर्यंत लयाला नेण्याचे कौशल्यच सरकारी महामंडळांनी अवगत केले आहे का ? असे वाटते. ही लाखाचे बारा हजार करण्याची वृत्ती सर्वत्रच दिसते.

आपल्या परिसरातील जनतेच्या समस्या सोडवा ! – बाजीराव कळंत्रे, संपर्कप्रमुख, शिवसेना

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार ‘गाव तेथे शाखा आणि घर तिथे शिवसैनिक’, अभियान गावात राबवा. मोठ्या प्रमाणात सदस्य नोंदणी करून आपल्या परिसरातील जनतेच्या समस्या सोडवा, अशा सूचना कोल्हापूर दक्षिण विधानसभा संपर्कप्रमुख बाजीराव कळंत्रे यांनी केल्या.

मडगाव नगरपालिका मंडळाच्या ‘आठवडाअखेर करवसुली’ मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद ! – मुख्याधिकारी फर्नांडिस

‘कर वेळच्या वेळी भरला जाईल’, अशी यंत्रणा उभी केल्यास ‘आठवडाअखेर करवसुली’ मोहिमेसारख्या मोहिमा पालिकेला राबवाव्या लागणार नाहीत !