गिर्ये आणि आचरा येथे सापडलेल्या चिनी बनावटीची संपर्क यंत्रणा असलेल्या नौकांची अनुज्ञप्ती ३ मासांसाठी रहित

३३ सहस्र रुपयांचा दंड

दोन्ही मासेमारी नौका धर्मांधाच्या मालकीच्या अल्पसंख्य असूनही गुन्हेगारीत बहुसंख्य असलेले धर्मांध !

देवगड – चिनी बनावटीची संपर्क यंत्रणा अवैधरित्या वापरणार्‍या रत्नागिरी येथील इब्राहिम साखरकर यांची १ आणि मिस्दाक मेहबूबखान फडनाईक यांची १, अशा २ मासेमारी नौका (ट्रॉलर) अनुक्रमे देवगड तालुक्यातील गिर्ये आणि मालवण तालुक्यातील आचरा येथील समुद्रात सापडल्या होत्या. या दोन्ही नौकांची अनुज्ञप्ती ३ मासांसाठी रहित करण्यासह दोन्ही मासेमारी नौकांना मिळून ३३ सहस्र ६०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे, तसेच या नौकांवर पुढील कायदेशीर कारवाईही करण्यात येणार आहे.

रत्नागिरी तटरक्षक दलाला २ ऑक्टोबर या दिवशी देवगड तालुक्यातील गिर्ये येथील समुद्रात ३ मासेमारी नौकांवर चिनी बनावटीची संपर्क यंत्रणा असल्याचे समजले होते. त्या दिवशी वादळसदृश स्थितीमुळे या नौकांचा शोध घेता आला नव्हता. ४ ऑक्टोबर या दिवशी सकाळी ११ वाजता गिर्येसमोरील समुद्रात इब्राहिम साखरकर यांच्या एका नौकेचा शोध लागला. उर्वरित २ नौकांचा शोध चालू असतांना आचरा (मालवण) समोरील समुद्रात रत्नागिरी येथील मिस्दाक मेहबूबखान फडनाईक यांच्या मालकीची एक नौका आढळली होती. या मासेमारी नौकेवरही चिनी बनावटीची संपर्क यंत्रणा असल्याचे स्पष्ट झाले होते.

मत्स्यपरवाना अधिकारी रवींद्र मालवणकर यांनी या मासेमारी नौकांवर कारवाईचा प्रस्ताव देवगडचे तहसीलदार तथा अभिनिर्णय अधिकारी मारुति कांबळे यांच्याकडे सादर केला होता. त्यावर अभिनिर्णय अधिकारी कांबळे यांनी दिलेल्या निकालानुसार इब्राहिम साखरकर यांच्या मालकीच्या नौकेला २८ सहस्र ६०० रुपये, तर मिस्दाक फडनाईक यांच्या नौकेला ५ सहस्र रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या नौकांवरील चिनी बनावटीची संपर्क यंत्रणा कह्यात घेण्यात आली. नौकांमध्ये १२ खलाशांची क्षमता असतांना ३४ खलाशी ठेवण्यात आले होते.