
कोल्हापूर, ९ ऑक्टोबर – नवरात्रोत्सवातील पहिल्याच दिवशी दुपारी ४ वाजता श्री महालक्ष्मीदेवीच्या मंदिरात पूजेच्या ठिकाणी बाँब ठेवल्याचा निनावी दूरभाष पोलीस मुख्यालयात आला होता. यानंतर पोलिसांनी बाँबशोधक पथकाच्या साहाय्याने अन्वेषण केले असता काहीही आढळून आले नव्हते. या प्रकरणाचे अधिक अन्वेषण करत पोलिसांनी पेठ वडगाव येथील बाळासाहेब कुरणे आणि सुरेश लोंढे या दोघांना कह्यात घेतले आहे. या दोघांनी मद्याच्या नशेत हा दूरभाष केल्याचे समोर आले आहे. या दोघांनी ‘गोवा नियंत्रण कक्षा’लाही दूरभाष केला होता. गोवा येथून कोल्हापूर पोलीस अधीक्षकांना याविषयी कळवण्यात आले होते. (अशांना कठोरात कठोर शिक्षा केल्यासच पुन्हा असे कृत्य करण्यास कुणी धजावणार नाही ! – संपादक)
बनावट उत्पन्न दाखल्यांवर मिळालेले ‘आर्.टी.ई.’ प्रवेश रहित करा ! – माजी आमदार नरेंद्र पवार यांची मागणी
देहू येथील श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने वारीत अपघाती मृत्यू झाल्यास १ लाख रुपयांचे साहाय्य !
राज्यात मतदार सूचींच्या विशेष सखोल पुनरावलोकनाचा सुधारित कार्यक्रम घोषित !
शासनाच्या परीक्षा ऑनलाईन घेण्याविषयी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना !
आरोग्य, पाणीपुरवठा आणि प्राथमिक शिक्षण समिती सभापती, तसेच उप-सभापती निवड !
विद्यार्थ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी अ.भा.वि.प. शिष्टमंडळाकडून विविध मंत्र्यांच्या भेटी ! – अथर्व कुलकर्णी, अ.भा.वि.प.