आपल्या परिसरातील जनतेच्या समस्या सोडवा ! – बाजीराव कळंत्रे, संपर्कप्रमुख, शिवसेना

शिवसैनिकांना मार्गदर्शन करतांना बाजीराव कळंत्रे, तसेच अन्य

कोल्हापूर, ९ ऑक्टोबर (वार्ता.) – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार ‘गाव तेथे शाखा आणि घर तिथे शिवसैनिक’, अभियान गावात राबवा. मोठ्या प्रमाणात सदस्य नोंदणी करून आपल्या परिसरातील जनतेच्या समस्या सोडवा, अशा सूचना कोल्हापूर दक्षिण विधानसभा संपर्कप्रमुख बाजीराव कळंत्रे यांनी केल्या. बाजीराव कळंत्रे यांनी उचगाव, गांधीनगर, गडमुडशिंगी येथील प्रत्येक विभागातील स्थानिक शिवसैनिक आणि पदाधिकारी यांच्याशी सवांद साधला.

या वेळी उपजिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, करवीर तालुकाप्रमुख राजू यादव, युवासेनेचे जिल्हाधिकारी मंजित माने, किरण पडवळ, दीपक पाटील, पोपट दांगट, सागर पाटील, विनायक जाधव, संतोष चौगुले, सचिन नागटिळक, प्रफुल्ल घोरपडे यांसह अन्य उपस्थित होते.