राजकीय लढायांसाठी न्यायालयाचा वापर करता कामा नये !
परिवहनमंत्री अनिल परब यांच्या विरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाने सुनावले.
परिवहनमंत्री अनिल परब यांच्या विरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाने सुनावले.
कोरोनाच्या संसर्गाचे कारण पुढे करत वहात्या पाण्यात विसर्जनास बंदी घालणार्या प्रशासनाला संकलन केंद्रांवरील गर्दी दिसत नाही का ?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ९ सप्टेंबर या दिवशी संभाजीनगर जिल्ह्यातील विविध विकास कामांचा आढावा घेतला होता, तेव्हा त्यांनी पैठण येथील संतपिठाचे शैक्षणिक व्यवस्थापन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठाकडे सोपवण्याची सूचना केली होती.
साकीनाका येथील बलात्कार प्रकरणानंतर त्यांनी पथकासह पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेतली.
‘अशाप्रकारे श्री गणेशमूर्तींची विटंबना होणार नाही’, असे आश्वासन मुख्याधिकारी यांनी या वेळी दिले.
राजा ठाकरे यांच्या हलगर्जीपणामुळे तडवी यांच्या गुन्ह्यातील आरोपी आधुनिक वैद्यांना जामीन मिळाला होता, असा आरोप पीडितेच्या आईने केला आहे.
इंदिरा गांधींनी भ्रष्टाचाराला शिष्टाचार करण्याची कुप्रथा पाडली, त्याचा आज वृक्ष झाला आहे. ‘अधिकार्यांना राजकीय नेत्यांकडे पैसे पोचवावे लागतात’, असे अधिकारी सांगतात. भ्रष्टाचार समूळ नष्ट करण्यासाठी नैतिक शासनकर्त्यांची आवश्यकता आहे.
‘प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करता असा प्रकार कोणत्याही चालकाने करू नये’, अशी सूचनाही अहिरे यांनी केली आहे.
महावितरणसमोर सध्या एकूण ७३ सहस्र ८७९ कोटी रुपयांची थकबाकी आहे; मात्र वीजदेयकाच्या थकबाकीचे प्रकरण गांभीर्याने न घेतल्यास राज्य अंधारात जाईल, अशी भीती मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांनी बोलून दाखवली.
१५ सप्टेंबर या दिवशी जालना येथे एका तरुणाने मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही म्हणून आत्महत्या केली आहे. यावर प्रतिक्रिया देतांना अशोक चव्हाण पुढे म्हणाले की, ही अतिशय दुर्दैवी घटना आहे.