पुण्यात १४ वर्षाच्या शाळकरी मुलीने ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली, आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट !

मुलांना मनुष्य जन्माचे महत्त्व आणि त्याचा शाश्वत आनंदासाठी कसा वापर करायचा याचे शिक्षण दिले जात नसल्याने ते अशाश्वत गोष्टींमध्ये अडकून त्यासाठी स्वतःचे मौल्यवान प्राण गमावून बसत आहेत.

जागेच्या वादातून जातीवाचक शिवीगाळ केल्याच्या आरोपात छिंदम बंधूंना अटक !

काही वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अपशब्द वापरल्याने वादग्रस्त ठरलेल्या माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम आणि त्यांचा भाऊ श्रीकांत छिंदम यांना तोफखाना पोलिसांनी १५ सष्टेंबर या दिवशी अटक केली असून त्यांच्या अन्य साथीदारांचा शोध चालू आहे.

परमबीर सिंह यांनी मुंबई उच्च न्यायालयात चौकशीच्या विरोधात केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली !

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या खंडणी वसुलीचा खळबळजनक आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह हे देखील कायद्याच्या कचाट्यात अडकले आहेत.

राज्याचे प्रलंबित विषय तातडीने मार्गी लावणार ! – नीती आयोग

जी.एस्.टी. परतावा, प्रधानमंत्री पीक विमा योजना, कांजूर मार्ग मेट्रो डेपो, धारावी पुनर्विकासासाठी रेल्वेची भूमी मिळणे यांसह राज्याचे केंद्र सरकारकडे प्रलंबित असलेले प्रश्न लवकर मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन केंद्रीय नीती आयोगाच्या अधिकार्‍यांनी दिले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.

चिपळूण येथे १०० टक्के श्री गणेशमूर्तींचे वहात्या पाण्यात करण्यात आले विसर्जन !

हिंदुत्वनिष्ठ संघटना, हिंदु जनजागृती समिती आणि धर्मप्रेमी नागरिक यांनी संघटितपणे केलेल्या विरोधाचा परिणाम !

श्री गणेशमूर्तीचे विसर्जन बाराही मास पाणी असलेल्या जलस्रोतात करावे !

हिंदु जनजागृती समितीची सोलापूर महापालिकेकडे मागणी

विशाळगडावरील अतिक्रमणे हटवण्याचा जिल्हाधिकार्‍यांचा आदेश !

कोल्हापूरच्या जिल्हाधिकार्‍यांची ‘विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समिती’सह बैठक

जेजुरी देवस्थानाची ११३ एकर भूमी त्यांना मिळणार !

सरकारीकरण झालेली मंदिरे आणि पवित्र स्थाने यांची स्थिती काय होऊ शकते ?, हे या उदाहरणातून लक्षात येते. यामुळे सरकारीकरण रहित करून मंदिरे भक्तांच्या कह्यात देण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करा !

परिवहनमंत्री अनिल परब भाजपचे सोमय्या यांच्या विरोधात १०० कोटींचा अब्रुहानीचा दावा करणार !

सोमय्या यांनी परब यांच्यावर दापोली येथे बेकायदा उपाहारगृह बांधणे, परिवहन विभागात स्थानांतराचे ‘रॅकेट’ चालवणे असे गंभीर आरोप केले होते.

आतंकवादी जान महंमद शेख याचे २० वर्षांपासून दाऊदशी संबंध होते, तसेच आमचे त्याच्यावर लक्ष होते ! – विनीत अग्रवाल, अतिरिक्त महासंचालक, आतंकवादविरोधी पथक

पोलीस अधिकार्‍यांनी नुसती अशी माहिती देऊन काय उपयोग ? एवढी वर्षे एक आतंकवादी दाऊदशी संबंध ठेऊन मुंबईत रहात आहे, तर तेव्हाच कारवाई का केली नाही ? ‘आमचे त्याच्यावर लक्ष होते’ या म्हणण्याला काय अर्थ आहे ?