नागपंचमीच्या दिवशी केल्या जाणार्‍या नागाच्या पूजनाचे महत्त्व !

‘नागपंचमी’ हे व्रत श्रावण शुक्ल पक्ष पंचमी या तिथीला केले जाते. स्थान आणि लोकाचार यांतील भेद पहाता श्रावण कृष्ण पक्ष पंचमीलाही हे पर्व साजरे केले जाते. या पर्वामध्ये परविद्धा पंचमी (षष्ठीसहित आलेली पंचमी) ग्राह्य धरली जाते.

शिवचरित्र आणि इतिहासविषयक लिखाण सामान्यांपर्यंत पोचवण्याचे कार्य करणारे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे !

इतिहासाविषयी अभिमान, सत्यता पडताळण्याची संशोधक वृत्ती, संयम, चिकाटी, अचाट स्मरणशक्ती आदी गुणांचा समुच्चय बाबासाहेब पुरंदरे यांच्या व्यक्तीमत्त्वामध्ये आहे. त्यांच्या कार्याविषयीची माहिती या लेखात देत आहोत.

आयुर्वेद, अध्यात्म, भारतीय संगीत आणि परंपरा, सण-उत्सव अन् ध्यानधारणा या विषयांत लौकिक निर्माण करणारे श्रीगुरु वैद्य बालाजी तांबे !

वैद्य बालाजी तांबे यांनी आयुर्वेदाचे महत्त्व विविध सामाजिक माध्यमांतून समाजाला अवगत केले. ‘आयुर्वेद, अध्यात्म, भारतीय संगीत, भारतीय परंपरा आणि सण-उत्सव, ध्यानधारणा’, अशा अनेकविध विषयांत वैद्य तांबे यांनी स्वतःचा लौकिक निर्माण केला.

हिंदूंचे वेद, शास्त्र आणि पुराणे यांनुसारच मंदिराचे प्रशासन चालले पाहिजे ! – अधिवक्ता विष्णु शंकर जैन, प्रवक्ते, हिंदु फ्रंट फॉर जस्टिस

संसदेतील कायद्याप्रमाणे नाही, तर मंदिरामध्ये स्थानापन्न असलेल्या देवतेच्या नियमाप्रमाणे, तसेच हिंदूंचे वेद, शास्त्र आणि पुराणे यांनुसारच मंदिर चालले पाहिजे.

मंदिरांतील धन लुटणे आणि हिंदूंच्या श्रद्धांचे भंजन करणे, हे धर्मांधांचे षड्यंत्र ! – गंगाधर कुलकर्णी, कार्याध्यक्ष, श्रीराम सेना

मंदिरांतील धन लुटणे आणि हिंदूंच्या श्रद्धांचे भंजन करणे, हे धर्मांधांचे षड्यंत्र आहे. या मागे एस्.डी.पी.आय. आणि पी.एफ्.आय. या संघटना आहेत. याविषयी समाजात जागृती करणे आवश्यक आहे.  

प्रेमभाव असणारे आणि तळमळीने सेवा करून साधकांच्या व्यष्टी-समष्टी साधनेची घडी बसवणारे ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. यशवंत सहस्रबुद्धे !

‘काका सर्वांना हवेहवेसे वाटतात. ते साधकांवर वडिलांप्रमाणेच प्रेम करतात.

सनातनचे ४६ वे संत पू. भगवंत कुमार मेनराय (वय ८३ वर्षे) यांनी साधकांना साधनेच्या संदर्भात केलेले अनमोल मार्गदर्शन !

एका नामजपाच्या सत्राच्या वेळी पू. भगवंत कुमार मेनराय यांनी साधकांना साधनेच्या संदर्भात पुढील अनमोल मार्गदर्शन केले.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीबाहेर नागाची आकृती दिसल्यावर ‘नागदेवता परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या रक्षणासाठी दाराबाहेर उभी आहे’, असे जाणवणे

‘एकदा मी सकाळी ६ वाजून १५ मिनिटांनी सेवेसाठी जात होतो. त्या वेळी माझे लक्ष सहजपणे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीकडे गेले. खोलीच्या मुख्य दाराबाहेर उजव्या बाजूला मला एका नागाची आकृती वायूरूपात (पांढर्‍या रंगाची) स्पष्टपणे दिसली.

समंजस आणि भावपूर्ण सेवा करून संतांचे मन जिंकणारी ६५ टक्के आध्यात्मिक पातळीची महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आलेली कु. वेदश्री रामेश्वर भुकन (वय ८ वर्षे) !

कु. वेदश्री रामेश्वर भुकन हिचा ८ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिचे आई-वडील आणि साधिका यांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

सनातनच्या डिचोली, गोवा येथील साधिका सौ. पुष्पा पराडकर यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी प्राप्त केल्यावर त्यांच्या शेजारी रहाणार्‍या साधिकेने श्रीकृष्णचरणी अर्पण केलेले काव्यपुष्प !

आज नागपंचमीला त्यांचा वाढदिवस आहे. त्या निमित्त त्यांच्या शेजारी रहाणार्‍या साधिकेने त्यांच्याविषयी मनात उमललेले काव्यपुष्प श्रीकृष्णचरणी अर्पण केले आहे. ते येथे देत आहोत.