२५.७.२०२० या दिवशी सौ. पुष्पा माधव पराडकर यांची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के घोषित करण्यात आली. आज नागपंचमीला त्यांचा वाढदिवस आहे. त्या निमित्त त्यांच्या शेजारी रहाणार्या साधिकेने त्यांच्याविषयी मनात उमललेले काव्यपुष्प श्रीकृष्णचरणी अर्पण केले आहे. ते येथे देत आहोत.
सौ. पुष्पा माधव पराडकर यांना ७२ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने नमस्कार !
‘ती’ गुरुकृपेसाठीच तळमळते ।
श्रावणमासारंभी कन्यारत्न जन्मले ।
‘मणेरीकरां’च्या (टीप १) घरी ।
मनुष्यजन्माचे सार्थक करी ।
झडकरी साधनेच्या जोरावरी ।। १ ।।
भावंडांची भगिनी ती ।
सुमन पुष्पासम सुगंधी ।
येथूनच तर जाहली ।
तिच्या साधनाप्रवासाची नांदी ।। २ ।।
हास्य जिचे लोभसवाणे ।
गुणगुणते ती गुरुगुण गाणे ।
सोशिक अन् काटकसरी होणे ।
तिची तीच नेमकी जाणे ।। ३ ।।
हे सुंदर, सालस पुष्प मनाचे ।
‘माधवा’स (टीप २) जे अती प्रिय झाले ।
‘पराडकर’ कुळ अवघे ।
तव आगमने सुख, आनंदे न्हाले ।। ४ ।।
संकट ठाकता सामोरे ।
गुरुरूप स्मरूनी हसावे ।
नियोजनाचे कौशल्य ते ।
तिज पूर्वीच ज्ञात असावे ।। ५ ।।
सुगरण तर आहेच ती ।
पदार्थांत घालीतसे प्रीती ।
शिकूनी अध्यात्म-पाककृती ।
ईश्वरास आज ती प्रिय किती ।। ६ ।।
पार पाडूनी सुखेच कर्तव्ये ।
मनेही जपणे सदोदित ठावे ।
सहज वागणेही जे मनोभावे ।
तिच्यासम तर तिनेच असावे ।। ७ ।।
कुणी म्हणावे, ‘आते’ तुजला ।
तर कुणी म्हणावे, ‘वहिनी’ ।
अनुभूतींचा कोंब रुजला मनी ।
ही तर ‘साधनेचीच वाहिनी’ ।। ८ ।।
प्रसारातील सुमन सुबक ते ।
समष्टीत आज दरवळते ।
मुक्त होऊनी जन्म-मृत्यूच्या कैक फेर्यांतूनी ।
ती गुरुकृपेसाठीच तळमळते ।। ९ ।।
टीप १ : सौ. पुष्पा माधव पराडकर यांचे माहेरचे आडनाव मणेरीकर होते
टीप २ : सौ. पुष्पा पराडकर यांच्या यजमानांचे नाव माधव आहे.
– कु. साधना पांडुरंग आरोंदेकर, डिचोली, गोवा. (जानेवारी २०२१)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |