नागपंचमीच्या दिवशी केल्या जाणार्‍या नागाच्या पूजनाचे महत्त्व !

श्रावण शुक्ल पक्ष पंचमी (१३ ऑगस्ट २०२१) या दिवशी असलेल्या ‘नागपंचमी’च्या निमित्ताने…

‘नागपंचमी’ हे व्रत श्रावण शुक्ल पक्ष पंचमी या तिथीला केले जाते. स्थान आणि लोकाचार यांतील भेद पहाता श्रावण कृष्ण पक्ष पंचमीलाही हे पर्व साजरे केले जाते. या पर्वामध्ये परविद्धा पंचमी (षष्ठीसहित आलेली पंचमी) ग्राह्य धरली जाते. नागपंचमीच्या दिवशी ‘नागांना दुधाने स्नान घालून त्यांचे पूजन करणे, त्यांना दूध पाजणे; घरातील दरवाजावर दोन्ही बाजूंनी गायीच्या शेणाचा सर्प सिद्ध करून दही, दूर्वा, दर्भ, गंध, अक्षता, पुष्प, मोदक आणि मालपुवा (गोड पदार्थ) आदींनी त्याची पूजा करणे, तसेच ब्राह्मणांना भोजन देणे, स्वतः एकभुक्त राहून व्रत करणे’, हे सर्व केल्याने घरामध्ये सर्पाचे भय रहात नाही.

‘ॐ कुरुकुल्ले हुं फट् स्वाहा ।’

(म्हणजे ‘देवी कुरुकुल्ले, तुला हे अर्पण असो.’ हा जप थोडा वेळ केल्यानेही सर्पविष दूर होते.’

(साभार : मासिक ‘सत्संग पथ’, ऑगस्ट २००४)