ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि राष्ट्रप्रेमी शरद फडके यांच्या पुस्तिकेचे प्रकाशन ! 

श्री. शरद फडके यांच्या पुस्तिकेचे प्रकाशन करतांना डावीकडून श्री. विनायक कुन्नूर, श्री. शरद फडके आणि प्रा. सचिन कानिटकर

सांगली, २० ऑगस्ट (वार्ता.) – ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि राष्ट्रप्रेमी शरद फडके (वय ८२ वर्षे) यांच्या ‘माझा जीवनप्रवास’ या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले आहे. श्री. शरद फडके यांनी त्यांच्या आयुष्यात आलेले अनुभव, प्रसंग, घटना या पुस्तिकेत शब्दबद्ध केल्या आहेत. या वेळी विनायक कुन्नूर, शरद फडके आणि प्रा. सचिन कानिटकर उपस्थित होते.

श्री. शरद फडके यांचा अल्प परिचय

श्री. शरद फडके यांनी प्रकाशित केलेली पुस्तिका

१. सांगली जिल्हा नगरवाचनालयाच्या वतीने वासुदेव बळवंद फडके यांच्या स्मृतीदिनी म्हणजे १७ फेब्रुवारीला पुरस्कार देण्यात येतो. या पुरस्काराला देण्यात येणारी १५ सहस्र रुपयांची रक्कम श्री. फडके यांनी प्रायोजित केली आहे.

प्रत्येक वर्षी श्री. शरद फडके हे १७ फेब्रुवारीला सकाळी वासुदेव बळवंद फडके यांच्या स्मृतीदिनाचा कार्यक्रम घेतात. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी श्री. फडके हे प्रत्येक वर्षी हिंदु जनजागृती समितीला आवर्जून बोलावतात.

२. सांगली महापालिकेच्या समोरील वासुदेव बळवंत फडके चौकामध्ये १६ मे १९९६ ला ठराव क्रमांक १०० अन्वये या मार्गाचे ‘धर्मवीर संभाजी महाराज मार्ग’, असे नामकरण करण्यात आले होते. काळाच्या ओघात ते विस्मरणात गेले. हा ठराव मिळवण्यात श्री. फडके यांनी विशेष प्रयत्न केले. यानंतर शिवराज्याभिषेकदिनाच्या निमित्ताने श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्या हस्ते या फलकाचे अनावरण करण्यात आले.

३. शहरातील रस्ते समस्या, पाणी वाहिन्यांना होणारी पाणीगळती, स्मशानभूमीतील समस्या यांसह विविध प्रश्नांवर अत्यंत चिकाटीने श्री. फडके हे महापालिका आणि संबंधित खात्यांकडे निवेदन, पत्रव्यवहार यांद्वारे प्रयत्नशील असतात. या समस्या सुटेपर्यंत ते त्याचा पाठपुरावा घेतात.

दैनिक ‘सनातन प्रभात’चे आभार !

‘माझ्या सामाजिक कार्यांच्या बातम्या वेळोवळी वृत्तपत्रातून प्रकाशित करणार्‍यांचा मी आभारी आहे. यात दैनिक ‘सनातन प्रभात’चे श्री. अजय केळकर यांच्यासह विविध दैनिकांनी मला सहकार्य केले.