कोरोना संसर्गामुळे पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांचे संपूर्ण शुल्क माफ !
पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाने २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी शुल्कात कपात केली असून कोरोना संसर्गामुळे पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांचे संपूर्ण शुल्क माफ केले आहे. त्यामुळे आर्थिक अडचणी असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. ग्रंथालय, प्रयोगशाळा, जिमखाना, संगणक सुविधा इत्यादी शुल्कामध्ये ५० टक्के कपात केली आहे. उपक्रम शुल्क ७५ टक्के, परीक्षा शुल्क २५ टक्के, तर उद्योग भेट, महाविद्यालय नियतकालिक, प्रयोगशाळा, अन्य ठेवी, आरोग्य तपासणी, आपत्ती व्यवस्थापन आणि अश्वमेध महोत्सव या शुल्कांमध्ये १०० टक्के कपात केली आहे.
ऑनलाईन नियतकालिके प्रसिद्ध करणारी महाविद्यालये २५ टक्के, तर मुद्रित नियतकालिक प्रसिद्ध करणारे ५० टक्के शुल्क घेऊ शकतात. या व्यतिरिक्त ऑनलाईन उपक्रम घेणार्या महाविद्यालयांना ५० टक्के शुल्क घेता येणार आहे.