अशा माथेफिरूंना लवकर शिक्षा झाली पाहिजे !
पिंपरी – नेहरूनगर येथील लसीकरण केंद्रात महिलेने चाकू घेऊन प्रवेश करत लसीकरण करणार्या आशा सेविकेला खुर्चीने मारहाण केली, तसेच आरोपी महिलेने सेल्फी पॉइंटचीही तोडफोड केली. तुम्ही लसीकरण करू नका. येथे लोकांना मारण्यासाठी आला आहात का ? असे विचारत हुल्लडबाजी केली. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी या महिलेच्या विरोधात पिंपरी-चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.