महाराष्ट्रात १२ वीची परीक्षा होणार नाही ! – विजय वडेट्टीवार

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने १२ वीची परीक्षा रहित करण्याचा निर्णय यापूर्वीच घोषित केला आहे. महाराष्ट्र सरकारकडून १० वीची परीक्षा रहित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नादुरुस्त ‘व्हेंटिलेटर्स’ पालटावे लागतील ! – संभाजीनगर खंडपीठ

हे न्यायालयाला का सांगावे लागते ? रुग्णालय प्रशासनाच्या हे लक्षात का येत नाही ?

स्थलांतरित ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी १० जिल्ह्यांत वसतीगृहे चालू करण्याचा राज्यशासनाचा निर्णय !

यामध्ये बीड, नगर, जालना, नांदेड, परभणी, धाराशिव, लातूर, संभाजीनगर, नाशिक आणि जळगाव या १० जिल्ह्यांमधील ४१ तालुक्यांमध्ये ही वसतीगृहे चालू करण्यात येणार आहेत.

मदर तेरेसा अग्रलेखाविषयी त्वरित क्षमा मागणारे कुबेर छत्रपती संभाजी महाराजांच्या अवमानावर क्षमा का मागत नाहीत ? – हिंदु जनजागृती समिती

पत्रकार गिरीश कुबेर यांच्या पुस्तकाविषयी राज्य सरकार गप्प का ?

पसार साहाय्यक पोलीस निरीक्षक महावीर जाधव यांना अटक !

पोलीस निरीक्षकासह ४ पोलीस कर्मचार्‍यांना अटक करण्यात आली होती, तर साहाय्यक पोलीस निरीक्षक महावीर जाधव पसार झाले होते. अखेर त्यांना २ जून या दिवशी अटक करण्यात आली आहे.

कोरोनाच्या कालावधीत प्रथमच अन्नधान्य चोरीप्रकरणी गुन्हा नोंदवतांना संवेदनशीलता दाखवावी ! – मुंबई उच्च न्यायालय

कोरोनाच्या काळात नोकरी गेल्यामुळे प्रथमच अन्नधान्याच्या चोरीचा गुन्हा करणार्‍यांविषयी पोलिसांनी तातडीने गुन्हे नोंदवू नयेत. असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांना दिले.

मुंबईसह राज्यातील अन्य पालिकांच्या निवडणुका लढवणार ! – राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे

दैनिक ‘लोकसत्ता’ला दिलेल्या ऑनलाईन मुलाखतीमध्ये राज ठाकरे यांनी वरील वक्तव्य केले.

या वर्षीचा शिवराज्याभिषेकदिन घरात राहून साजरा करा ! – खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले

या वर्षी कोरोनामुळे शिवराज्याभिषेकदिन साधपेणाने साजरा केला जाणार आहे. सर्व शिवभक्तांचा प्रतिनिधी म्हणून मी रायगडावर जाऊन आपल्या सर्वांच्या वतीने सोहळा अखंडितपणे साजरा करण्याचे दायित्व माझे असेल.

कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना ‘म्युकरमायकोसिस’ची लक्षणे समजावून सांगणे आवश्यक ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

ओबीसी आरक्षणाविषयी राज्य सरकारने १५ मास झोपा काढल्या आहेत. राज्यात कोविड आजारामध्ये ‘रेमडेसिवीर इंजेक्शन’ दिलेल्या, तसेच कोविडमुक्त झालेल्या रुग्णांचा शोध घेऊन त्यांना ‘म्युकरमायकोसिस’ आजाराच्या लक्षणांविषयी माहिती देणे आवश्यक आहे….

कोल्हापूर, सांगली आणि  बेळगाव जिल्ह्यात मुसळधार पाऊस !

दुपारपासून कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहिसा दिलासा मिळाला आहे. बेळगावातही पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत.