स्थलांतरित ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी १० जिल्ह्यांत वसतीगृहे चालू करण्याचा राज्यशासनाचा निर्णय !

ऊसतोड कामगार

मुंबई – स्थलांतरित ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी राज्यशासन ‘संत भगवानबाबा शासकीय वसतीगृह योजना’ चालू करणार आहे. २ जून या दिवशी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यामध्ये बीड, नगर, जालना, नांदेड, परभणी, धाराशिव, लातूर, संभाजीनगर, नाशिक आणि जळगाव या १० जिल्ह्यांमधील ४१ तालुक्यांमध्ये ही वसतीगृहे चालू करण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात अशा प्रकारे १० वसतीगृहे चालू करण्यात येणार आहेत. महाराष्ट्रात २३२ साखर कारखाने असून त्यामध्ये ८ लाख ऊसतोड कामगार काम करतात.