मुंबई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ३ जून या दिवशी झालेल्या आपत्कालीन विभागाच्या बैठकीत १२ वीची परीक्षा रहित करण्याचा प्रस्ताव संमत करण्यात आला आहे, अशी माहिती साहाय्य आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने १२ वीची परीक्षा रहित करण्याचा निर्णय यापूर्वीच घोषित केला आहे. महाराष्ट्र सरकारकडून १० वीची परीक्षा रहित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.