हिंगोली येथील प्राचार्य संजीवकुमार भारद्वाज ‘ग्लोबल प्रिन्सीपल अवॉर्ड’ने सन्मानित !
‘पोदार इंटरनॅशनल स्कूल’चे प्राचार्य संजीवकुमार भारद्वाज यांना हरियाणा येथील ‘अलर्ट नॉलेज सर्व्हिसेस एज्युकेशन संस्थे’द्वारे दिला जाणारा ‘ग्लोबल प्रिन्सीपल अवॉर्ड’ घोषित करून २२ जून या दिवशी ‘ऑनलाईन’ कार्यक्रमात या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले.
कोरोना प्रतिबंधात्मक लस न घेणार्यांना कारागृहात टाकणार ! – फिलिपीन्सच्या राष्ट्रपतींची चेतावणी
लोकांसमोर आता २ पर्याय आहेत. एक तर लस घ्या अथवा तुम्हाला मी तुरुंगात पाठवणार. तुम्हाला काय हवे आहे, याची निवड तुम्हीच करायची आहे, अशा शब्दांत फिलिपीन्सचे राष्ट्रपती रोड्रिगो दुतेर्ते यांनी जनतेला चेतावणी दिली आहे.
नोकरीचे आमीष दाखवून ९ राज्यांतील तरुणांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणार्या टोळीतील ७ जणांना अटक !
नोकरी लावण्याचे आमीष दाखवून सहस्रो तरुणांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी टोळीतील ७ जणांना येथील स्थानिक गुन्हे शाखा आणि वसमत पोलीस यांच्या संयुक्त पथकाने नांदेड, लखनऊ, देहली, मुंबई, ओडिशा येथून अटक केली आहे.
खासदार नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र रहित करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती !
खोटे जात प्रमाणपत्र ६ सप्ताहांच्या आत शासनाकडे जमा करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यानंतर राणा यांनी उच्च न्यायालयाच्या निकालाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती.
२६ जूनला भाजपचे राज्यभर चक्का जाम आंदोलन – आमदार जयकुमार गोरे
आमदार जयकुमार गोरे यांनी विश्रामगृह येथे पत्रकारांशी संवाद साधला. आमदार गोरे पुढे म्हणाले की, राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचे आरक्षण रहित झाले आहे. याविषयी सरकार तांत्रिक माहिती पुरवू शकलेले नाही.
भिवंडी येथील एम्आयएम्च्या शहराध्यक्षांवर बलात्काराचा गुन्हा नोंद
भिवंडीतील एम्आयएम् पक्षाचे शहराध्यक्ष खालिद गुड्डू याच्यावर एका ३८ वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
प्रश्नोत्तरे, तारांकित आणि लक्षवेधी यांना बगल देऊन विधीमंडळाचे अधिवेशन केवळ २ दिवसांचे होणार !
१५ दिवसांच्या अधिवेशनाच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने कामकाज समितीच्या बैठकीवर विरोधकांचा बहिष्कार !
अन्य मागासवर्गीय समाजाच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ देणार नाही ! – विजय वडेट्टीवार, मदत आणि पुनर्वसन मंत्री
जातीच्या आधारे लाभ मिळवण्यापेक्षा स्वत:मध्ये तशी पात्रता निर्माण करण्यासाठी समाजाला पात्र बनवणे, हे खर्या लोकनेत्यांचे दायित्व आहे. तसे न करता मतांसाठी समाजाला आरक्षणाचे गाजर दाखवणे, हे ना त्या समाजासाठी, ना त्या राष्ट्रासाठीही हिताचे ठरेल !
परकीय चलन अपव्यवहारप्रकरणी व्यावसायिक अविनाश भोसले यांच्यावर ‘ईडी’ची कारवाई
परकीय चलन अपव्यवहार प्रकरणात येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले, तसेच त्यांचे कुटुंबीय यांची ४० कोटी ३४ लाख रुपयांची मालमत्ता २१ जून या दिवशी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) जप्त केली आहे.