खासदार नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र रहित करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती !

खासदार नवनीत राणा

मुंबई – अमरावती येथील अपक्ष खासदार नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र रहित करून त्यांना २ लाख रुपये दंड भरण्याच्या उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोेच्च न्यायालयाने २२ जून या दिवशी स्थगिती दिली.

वर्ष २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणूक निकालानंतर शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी खासदार राणा यांच्या जात प्रमाणपत्रावर आक्षेप घेत उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती. या प्रकरणी सुनावणी देतांना उच्च न्यायालयाने राणा यांचे जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र अवैध असल्याचा निकाल दिला होता, तसेच उच्च न्यायालयाने ‘हा घटनेवरील घोटाळा आहे’, असे मतही नोंदवले होते. खोटे जात प्रमाणपत्र ६ सप्ताहांच्या आत शासनाकडे जमा करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यानंतर राणा यांनी उच्च न्यायालयाच्या निकालाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती.