चामराजनगर (कर्नाटक) येथे ऑक्सिजन पोचायला उशीर झाल्याने रुग्णालयातील २४ कोरोनाबाधितांचा मृत्यू !

राज्यातील चामराजनगर येथील रुग्णालयात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे २४ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर म्हैसूर येथून चामराजनगर येथे २५० ऑक्सिजन सिलिंडर पाठवण्यात आले आहेत.

कोटा (राजस्थान) येथे कोरोनाबाधित वृद्ध दांपत्याने नातवाला संसर्ग होऊ नये; म्हणून केली आत्महत्या !

कोरोनाबाधित झालेल्या एका वृद्ध दांपत्याने रेल्वेसमोर उडी घेत आत्महत्या केली. ‘स्वतःमुळे स्वतःच्या नातवालाही कोरोनाचा संसर्ग होईल, या भीतीपोटी या दांपत्याने आत्महत्या केल्याचे म्हटले जात आहे.

जानेवारी ते मार्च या काळात देशात विक्रमी ५८ सहस्र ८०० कोटी रुपयांची सोने खरेदी

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा विक्रीत ३७ टक्के वाढ झाली आहे. गेल्या वर्षी जानेवारी ते मार्च २०२० या काळात १०२ टन सोने विक्री झाली होती.

कोरोना : जनतेच्या ससेहोलपटीला कारणीभूत कोण ?

खासगी डॉक्टर आणि कोविड सेंटर चालवणार्‍या स्पर्श हॉस्पिटलने रुग्णांच्या नातेवाइकांकडून १ लाख रुपये घेतल्याचा संतापजनक प्रकार !……गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात ऑक्सिजन आणि खाटा यांचा तुटवडा : कोरोनाचा कहर चालू असूनही ‘व्हीआयपी’ संस्कृती कार्यरत…

कामगारांना आर्थिक साहाय्याची शासनाकडून केवळ घोषणा, कामगार आयुक्त कार्यालयास सूचनाच नाही !

कामगारांच्या दैनंदिन जीवनातील मूलभूत गरजा भागवण्यासाठी येणार्‍या अडचणींवर तोडगा म्हणून सक्रीय बांधकाम कामगारांना दळणवळण बंदी मध्ये २-३ सहस्र रुपये आर्थिक साहाय्य देण्याची घोषणा करण्यात आली, परंतु कामगारांना ही रक्कम अजून मिळालेली नाही.

चिमणगाव (जिल्हा सातारा) येथील रेशन दुकानामध्ये अवैधरित्या मद्यविक्री

कोरेगाव तालुक्यातील चिमणगाव येथे एका रेशन दुकानातच अवैधरित्या मद्यविक्री चालू होती. या ठिकाणी सातारा येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकून संबंधिताना कह्यात घेतले असून ७ लाख रुपयांचा मुद्देमाल शासनाधीन करण्यात आला आहे.

गृहविलगीकरणातील कोरोनाबाधित रुग्णांवर आता शिक्षकांची दृष्टी रहाणार !

कोरोनाची सौम्य लक्षणे झाल्यानंतर ग्रामीण भागातील रुग्ण गृहविलगीकरणात रहाण्याची विनंती करतात. त्यांना तशी अनुमती दिली जाते; मात्र नंतर रुग्ण बाहेर फिरतात आणि संसर्ग वाढतो. त्यामुळे अशा रुग्णांवर लक्ष ठेवण्याचे दायित्व प्राथमिक शिक्षकांवर सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पुण्यातील आरोग्यव्यवस्था नेमकी कुणासाठी ? – आम आदमी पक्षाचा प्रश्‍न

हेल्पलाईनवरून खाटा मिळवून देण्यासाठी साहाय्य केले जात असले, तरी त्याच वेळी सर्व खासगी रुग्णालये आणि सरकारी कोविड सेंटरमध्ये रुग्णांची थेट भरती होते. गंभीर रुग्णाला अत्यावश्यक व्हेंटिलेटर सज्ज खाटा थेट रुग्णालयांकडून भरल्या जातात. त्यामुळे या जागा हेल्पलाईन वर उपलब्ध होत नाहीत असे दिसले.

रेमडेसिविर इंजेक्शनचा नियमित पुरवठा आणि सामायिक वितरणाविषयी राज्य आणि केंद्र सरकारला महत्त्वाचे निर्देश

न्यायालयाला केंद्र आणि राज्य सरकार यांना निर्देश देऊन कामे करवून घ्यावी लागतात, हे लज्जास्पद आहे. सर्व यंत्रणा हाताशी असतांना न्यायालयाला निर्देश द्यावे लागतात, याचा सरकारने विचार करावा !

ऑनलाईन ‘वीर सावरकर कालापाणी मुक्ती शताब्दी व्याख्यानमाला’ चालू

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि त्यांचे ज्येष्ठ बंधू क्रांतीवीर गणेश दामोदर सावरकर यांची २ मे १९२१ या दिवशी अंदमानच्या सेल्युलर कारागृहातून मुक्तता झाली. या ऐतिहासिक घटनेला २ मे २०२१ या दिवशी एक शतक पूर्ण झाले.