कामगारांना आर्थिक साहाय्याची शासनाकडून केवळ घोषणा, कामगार आयुक्त कार्यालयास सूचनाच नाही !

कामगार आयुक्त कार्यालयात सूचना वेळेत का जाऊ शकत नाहीत ? अशाने लोकांना लोकप्रतिनिधी केवळ आश्‍वासने देतात, असा विचार आल्यास चूक ते काय ? प्रशासनाने यातील अडचण लवकरात लवकर सोडवावी ही अपेक्षा !

प्रातिनिधिक छायाचित्र

संभाजीनगर – कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे महाराष्ट्रात १३ एप्रिल या दिवशी ३० एप्रिलपर्यंत ‘दळणवळण बंदी’ घोषित करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा १५ दिवसांनी हा कालावधी वाढवण्यात आला. या कालावधीत कामगारांच्या दैनंदिन जीवनातील मूलभूत गरजा भागवण्यासाठी येणार्‍या अडचणींवर तोडगा म्हणून सक्रीय बांधकाम कामगारांना २-३ सहस्र रुपये आर्थिक साहाय्य देण्याची घोषणा करण्यात आली, परंतु कामगारांना ही रक्कम अजून मिळालेली नाही. कामगार आयुक्त कार्यालयात याविषयीची लेखी सूचना आमच्यापर्यंत आली नाहीत, अशी माहिती कामगार आयुक्तालयातील अधिकार्‍यांनी दिली आहे.