जानेवारी ते मार्च या काळात देशात विक्रमी ५८ सहस्र ८०० कोटी रुपयांची सोने खरेदी

मुंबई – सोन्याच्या किमतीत झालेल्या घसरणीमुळे जानेवारी ते मार्च २०२१ या तिमाहीत ५८ सहस्र ८०० कोटी रुपयांच्या १४० टन सोन्याची विक्रमी विक्री झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा विक्रीत ३७ टक्के वाढ झाली आहे. गेल्या वर्षी जानेवारी ते मार्च २०२० या काळात १०२ टन सोने विक्री झाली होती.