ऑनलाईन ‘वीर सावरकर कालापाणी मुक्ती शताब्दी व्याख्यानमाला’ चालू

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे आयोजन

मुंबई – स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि त्यांचे ज्येष्ठ बंधू क्रांतीवीर गणेश दामोदर सावरकर यांची २ मे १९२१ या दिवशी अंदमानच्या सेल्युलर कारागृहातून मुक्तता झाली. या ऐतिहासिक घटनेला २ मे २०२१ या दिवशी एक शतक पूर्ण झाले. या शतकपूर्ती निमित्त हिंदुत्व विचारांचे सिंचन व्हावे आणि पुन्हा भारतवासियांच्या मनात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांची ज्योत प्रज्वलित व्हावी, यांसाठी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने २ मे ते १६ मे या कालावधीत ‘वीर सावरकर कालापाणी मुक्ती शताब्दी व्याख्यानमाले’चे आयोजन करण्यात आले आहे. ही व्याख्यानमाला स्मारकाचे फेसबूक पेज आणि यू ट्यूब यांमाध्यमातून सायंकाळी ७ वाजता ‘थेट’ प्रसारित करण्यात येणार आहे. या व्याख्यानमालेचा सर्व राष्ट्रप्रेमींनी अवश्य लाभ घ्यावा, अशी विनंती आयोजकांच्या वतीने करण्यात आली आहे. २ मे २०२१ या दिवशी स्मारकाचे कार्याध्यक्ष श्री. रणजित सावरकर यांनी ‘सावरकर और हिंदू संघठन’ या विषयावर संबोधित केले आहे. ४ मे या दिवशी ‘अब हिंदू अस्तित्व की आरपार लढाई’ या विषयावर श्री. अंकुर शर्मा यांनी संबोधित केले, ६ मे या दिवशी ‘वीर सावरकर का हिंदुत्व और निधर्मिता’ या विषयावर कॅप्टन सिकंदर रिझवी, ८ मे या दिवशी ‘हिंदुत्व पर समझौता नही’ या विषयावर माहिती आयुक्त श्री. उदय माहुरकर, १० मे या दिवशी ‘सामाजिक क्रांतीवीर सावरकर’ या विषयावर डॉ. नीरज व्यास देव, १२ मे या दिवशी ‘वीर सावरकर, राष्ट्रवार और विश्‍व युद्ध’ या विषयावर श्री. कपिल कुमार, १४ मे या दिवशी ‘कोविड-१९ : एक खौफनाक खुलासा’ या विषयावर (निवृत्त) मेजर जनरल डॉ. जी.डी. बक्षी आणि १६ मे या दिवशी ‘सावरकर की महत्त्वता’ या विषयावर राष्ट्रवादी वक्ते श्री. पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ त्यांचे विचार मांडणार आहेत.

या लिंकवर ही व्याख्यामाला चालू आहे : facebook.com/SavarkarSmarak