कोटा (राजस्थान) येथे कोरोनाबाधित वृद्ध दांपत्याने नातवाला संसर्ग होऊ नये; म्हणून केली आत्महत्या !

कोटा (राजस्थान) – येथे कोरोनाबाधित झालेल्या एका वृद्ध दांपत्याने रेल्वेसमोर उडी घेत आत्महत्या केली. ‘स्वतःमुळे स्वतःच्या नातवालाही कोरोनाचा संसर्ग होईल, या भीतीपोटी या दांपत्याने आत्महत्या केल्याचे म्हटले जात आहे. रेल्वे कॉलनीमध्ये रहाणारे हिरालाल बैरवा आणि त्यांची पत्नी शांती बैरवा अशी त्यांची नावे आहेत. कोरोनाची बाधा झाल्याने त्यांनी घरीच ‘क्वारंटाईन’ होण्याचा निर्णय घेतला होता. या दांपत्याच्या मुलाचे ८ वर्षांपूर्वी निधन झाले आहे.