गोवा शासनाचे ऑक्सिजनचा तुटवडा दूर करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न

मोले तपासणीनाक्यावर ऑक्सिजन टँकर सेस शुल्क न भरल्याने २० मिनिटे अडवून ठेवणारा वाहतूक खात्याचा अधिकारी सेवेतून निलंबित

गोवा खंडपिठाच्या हस्तक्षेपानंतर राज्यातील ऑक्सिजनचा तुटवडा दूर करण्यासाठी प्रशासन सक्रीय : गोवा खंडपिठाला सुपुर्द केला अहवाल

गोव्यात १४ मे या दिवशी ६१ रुग्णांचा मृत्यू झाला.

गोवा खंडपिठाच्या हस्तक्षेपानंतर रुग्णवाहिका आणि शववाहिका यांच्या दर आकारणीवर शासनाकडून निर्बंध लागू

रुग्णवाहिका आणि शववाहिका भरमसाठ दर आकारणी करत असल्याच्या वृत्ताची गोवा खंडपिठाने स्वेच्छा नोंद घेऊन शासनाला यासंबंधी कारवाई करण्याचे आदेश दिले.

कोरोनाची तिसरी लाट येईपर्यंत आपली साधनसुविधा सिद्ध पाहिजे ! – अधिवक्ता निखिल पै, जनहित याचिकादाराचे अधिवक्ता

गोवा खंडपिठाच्या हस्तक्षेपामुळे गोवा शासन गोमेकॉतील ऑक्सिजनच्या पुरवठ्यामध्ये सुधारणा करू शकली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोरोनाविषयीच्या अन्य घडामोडी

कणकवलीमध्ये ‘रॅपिड टेस्ट’मध्ये ८ जण कोरोनाबाधित असल्याचे उघड

१६ मेपासून येणार्‍या चक्रीवादळाच्या पार्श्‍वभूमीवर वीज आणि ऑक्सिजन यांचा पुरवठा सुरळीत रहाण्यासाठी नियोजन करण्याच्या जिल्हाधिकार्‍यांच्या सूचना

अरबी समुद्रामध्ये अल्प दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे.

कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांची माहिती तातडीने संकलित करा ! – जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी

कोरोनामुळे दोन्ही पालकांचा मृत्यू झाला अशा बालकांचा बाल कामगार म्हणून वापर होणार नाही किंवा त्यांची तस्करी होणार नाही, यासाठी वेळीच सावधानता बाळगणे आवश्यक आहे.

गोव्यातील ‘गोमेकॉ’मध्ये मध्यरात्री ऑक्सिजन संपल्याने १३ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू !

गोवा मेडिकल कॉलेजमध्ये पुन्हा एकदा ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. १३ मेच्या रात्री २ ते १४ मेच्या सकाळी ६ वाजेपर्यंत १३ जणांचा ऑक्सिजनच्या अभावी मृत्यू झाला. ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे हे मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

वडाळा महादेव (जिल्हा नगर) येथील महायोगी प.पू. गुरुदेव काटेस्वामीजी यांचे उत्तराधिकारी प.पू. भास्करकाका यांचा देहत्याग !

वडाळा महादेव येथील महायोगी प.पू. गुरुदेव काटेस्वामीजी यांचे शिष्य आणि उत्तराधिकारी प.पू. भास्करकाका यांनी १४ मेच्या पहाटे साडेसहा वाजता श्रीरामपूर येथील गुरुदेव काटेस्वामी आश्रमात देहत्याग केला. त्यांचे वय ६१ वर्षे होते. १५ मे या दिवशी सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

…तर काय आम्ही स्वतःला फासावर लटकवून घ्यायला हवे का ?

शासनकर्त्यांनी जनतेच्या प्रश्‍नांना सामोरे जाऊन त्यांचे शंकानिरसन करणे आवश्यक असते; मात्र ते करतांना चिडत असल्यास जनतेच्या मनात कधीतरी त्यांच्याविषयी सद्भावना निर्माण होऊ शकेल का ?