पणजी – कोरोनाची तिसरी लाट येईपर्यंत आपली साधनसुविधा सिद्ध पाहिजे. गोवा खंडपिठाच्या हस्तक्षेपामुळे गोवा शासन गोमेकॉतील ऑक्सिजनच्या पुरवठ्यामध्ये सुधारणा करू शकली आहे. यामध्ये एक चांगली गोष्ट म्हणजे गोमेकॉतील ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी असलेली ट्रॉली पद्धत आता बंद करणार आहे, तर यापुढे ऑक्सिजनचा पुरवठा ‘एल्.एम्.ओ.’ टाकीच्या माध्यमातून होणार आहे. यामुळे ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होण्यास साहाय्य होईल, अशी माहिती गोवा खंडपिठात जनहित याचिका प्रविष्ट केलेल्या एका याचिकादाराचे अधिवक्ता निखिल पै यांनी दिली.