देशातील प्रत्येक भूमीला देण्यात येणार ‘युनिक आयडेन्टीफिकेशन’ क्रमांक !
मार्च २०२२ पर्यंत देशातील प्रत्येक भूमीला १४ आकडी ‘युनिक आयडेन्टीफिकेशन’ क्रमांक देण्याची योजना केंद्र सरकारकडून बनवण्यात आली आहे. या क्रमांकाला महसूल नोंदी, बँकेचा खाते क्रमांक आणि आधार क्रमांक हेही जोडण्यात येणार आहेत.