कल्याण येथील श्री मलंगगड येथे हिंदूंकडून चालू असलेली आरती धर्मांधांच्या जमावाने रोखल्याचे प्रकरण
हिंदूंकडून शांततेत आणि नियम पाळून आरती केल्यावर आणि त्यात धर्मांधांनी अडथळा आणल्यावर हिंदूंवर गुन्हे का नोंद करण्यात आले ? हा पोलिसांचा पक्षपातीपणा आहे, असे हिंदूंना वाटते.
कल्याण, ३० मार्च (वार्ता.) – येथील श्री मलंगगड येथे असलेली श्री मलंगबाबांची आरती धर्मांधांच्या जमावाने ‘अल्ला हू अकबर’च्या घोषणा देत धक्काबुक्की करत रोखल्याची घटना २८ मार्च या दिवशी ८ वाजण्याच्या सुमारास घडली होती. या वेळी झालेल्या धक्काबुक्कीच्या वेळी मध्यस्थी करणार्या पोलिसांनाही धक्काबुक्की झाली. या प्रकरणी दोन्ही गटांवर उल्हासनगर येथील हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. सरकारी नियमांत अडथळा आणि कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा गुन्हा मुन्ना शेख यांच्यासह २० ते २५ जणांवर नोंद करण्यात आला असून ४ जणांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांचे १५ ते २० कार्यकर्ते होळी पोर्णिमेच्या दिवशी श्री मलंगबाबांच्या आरतीसाठी गेले होते; मात्र पोलिसांनी कोरोनाचे नियम पाळून ५ जणांना आरतीसाठी अनुमती दिली. आरती चालू असतांना या परिसरात रहाणारे मुन्ना शेख, झाकीर शेख, मोहम्मद अली शेख, गुड्डू शेख, हुसेन अन्सारी, तौकीक मुनिर शेख, सरफरोज शेख यांच्यासह जमावाने आरतीच्या ठिकाणी रात्री ८ वाजता धाव घेतली. त्यांनी आरती करणार्या विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या कार्यकर्त्यांच्या समोर येऊन ‘अल्ला हू अकबर’च्या घोषणा देऊन आरती रोखली होती. या वेळी झालेल्या धक्काबुक्कीच्या वेळी तैनात असलेल्या पोलिसांनी मध्यस्थी केल्याने पुढील अनर्थ टळला. मध्यस्थी करणार्या पोलिसांना धक्काबुक्की केल्याचा प्रकार धर्मांधांच्या गटाकडून झाला.